राज्यातील मशिदी आता उघडा , मौलाना यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

यासंदर्भात बोलताना शिष्टमंडळाचे प्रमुख माजी आमदार बशीर मुसा पटेल म्हणाले की, राज्यातील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे 23 मार्चपासून बंद आहेत.
राज्यातील मशिदी आता उघडा , मौलाना यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई: कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे 23 मार्च पासून बंद करण्यात आलेल्या मशिदी उघडण्यात यावयात, अशी मागणी मुंबईतील मुस्लिम समाजाचे धर्मगुरू म्हणजे मौलाना यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.

दक्षिण मुंबईतील मशिदीच्या शिष्टमंडळाने आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची भेट घेतली.  

निवेदन देऊन राज्यात टाळेबंदीच्या काळात बंद करण्यात आलेल्या मशिदी उघडण्यात याव्यात अशी मागणी केली.

यासंदर्भात बोलताना शिष्टमंडळाचे प्रमुख माजी आमदार बशीर मुसा पटेल म्हणाले की, राज्यातील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे 23 मार्चपासून बंद आहेत. त्याप्रमाणे मशिदीही बंद आहेत. गेले सात महिने लोकांना सामूहिक प्रार्थना करता येत नाही, त्यामुळे लोक व्याकूळ आहेत.

या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकारचे कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनाचे कौतुक केले.

 राज्य सरकारने योग्य पावले उचलली, म्हणून राज्यातील कोरोना आटोक्यात राहिला, असे सरकारचे कौतुक या शिष्टमंडळाने केले.

मशिदीमध्ये दैनंदिन पाच वेळा सामूहिक प्रार्थना केली जाते. मात्र सध्या मशिदी बंद आहेत. मुस्लिम समाजाचे बहुतेक मुख्य सण रमजान, मोहरम, ईद उल फित्र आदी टाळेबंदिच्या काळात होऊन गेले. त्यामुळे मशिदीमध्ये सामूहिक प्रार्थना करता आलेली नाही,असे मौलाना हाजी मोहम्मद युसुफ अन्सारी म्हणाले.

मशिदी उघडण्यास परवानगी दिली तर आम्ही क्षमतेच्या 30 टक्के मध्ये चालवण्यास तयार आहोत. तसेच सरकारने घालून दिलेल्या कार्यपद्धतीचे आम्ही तंतोतंत पालन करू. मशिदीमध्ये नमाज अदा करण्यापूर्वी वजू म्हणजेच हात-पाय व चेहऱ्याची स्वच्छता केली जाते. त्यामुळे कोरोना संसर्गाला अटकाव होईल. तसेच सामाजिक अंतराच्या नियमाचे आम्ही नमाजावेळी पालन करू, असे शिष्टमंडळातील मौलाना सरफराज सय्यद यांनी सांगितले.
मौलानांच्या शिष्टमंडळामध्ये मोहम्मद अन्सारी, शेख दिलशाद अहमद, इम्तियाज शेख, सुलतान अहमद, अन्सारी वसीम अहमद  आदी मौलाना सहभागी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in