कोरोनातून सुटले तर सापाने चावले : ठाण्यातील आमदाराची अशी ही परीक्षा; इतर नेतेही क्वारंटाईन
snake corona

कोरोनातून सुटले तर सापाने चावले : ठाण्यातील आमदाराची अशी ही परीक्षा; इतर नेतेही क्वारंटाईन

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या एका दिग्गज नेत्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि शिवसेनेच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाली. या नेत्यांनी कोरोनावर विजय मिळवला. मात्र, त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता, या नेत्यांना घरातूनच आपल्या मतदार संघातील गरिबांच्या अडचणी व त्यांना मदत पोहोचविण्याचे काम करावे लागत आहे.

ठाणे :  ठाणे जिल्ह्यात कोरोना या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात लागू करण्यात आलेली टाळेबंदी यांमुळे गोरगरीब व हातावर पोट असलेल्या मजुरांसह अनेकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यात हाताला काम नसल्यामुळे लोकांची आर्थिक कोंडी होत आहे. तर, अनेक मजुरांवर उपासमारीची वेळी आली होती. ही बाब लक्षात घेवून ठाण्यातील अनेक नेत्यांनी आपल्या मतदार संघात गोरगरीब नागरिकांच्या मदतीला धावून जात कुठे अन्न वाटप, कुठे अन्नधान्याचे कीट वाटप आदी कार्यक्रम हाती घेत, मदत करत होते.

हे करत असतांना ठाण्यातील राष्ट्रवादीच्या एका दिग्गज नेत्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि शिवसेनेच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाली. या नेत्यांनी कोरोनावर विजय मिळवला. मात्र, त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता, या नेत्यांना घरातूनच आपल्या मतदार संघातील गरिबांच्या अडचणी व त्यांना मदत पोहोचविण्याचे काम करावे लागत आहे. 

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्णतः टाळेबंदी लागू करण्यात आली. या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेतील अस्थापना व सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची अस्थापना व कार्यलयीन कामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे अनेकांना घरी बसण्याची वेळ आली आहे. तर, गोरगरीब व हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ ओढवली. याची गांभीर्याने दाखल घेत, राज्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या परीने त्याच्या मतदार संघातील गोरगरीब जनतेच्या मदतीला व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी प्रयत्न व मदत पोहोचवू लागला. त्यात कळवा –मुंब्रा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री हे देखील त्यांच्या मतदार संघात दिवसरात्र एक करून गोरगरीब जानेतेच्या मदतीला धावून गेले. कुठे शिजवलेल्या अन्नाचे वाटप करणे, कुठे अन्नधान्याच्या किटचे वाटप करणे आदी कामे करत असतांना, त्यांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले होते. त्यावर यशस्वीरीत्या त्यांनी मात करीत स्वगृही परतले आहे.

त्याचबरोबर ठाण्यातील राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी देखील या आजारावर विजय मिळवीत घरी परतले आहेत. तर, त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार यांना देखील आपल्या प्रभागात काम करीत असतांना कोरोनाने आपलेसे केले. मात्र, त्यांनी देखील या आजवर यशस्वी विजय मिळवीत घर गाठले. त्यावेळी त्यांनी आराम करण्यासाठी येऊन येथील बंगल्यावर गेले होते. तेथे त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच बाथरूमममध्ये साप चावल्याचे बोलले जात आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच ते पुन्हा घरी परततील असा विश्वासही त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला.

कोरोनाला हरवून पुन्हा घरो परतलेल्या या तिन्ही योद्ध्यांना सध्याच्या घडीला होम क्वारंटाइनमध्ये राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता, या नेत्यांना घरातूनच आपल्या मतदार संघातील गरिबांच्या अडचणी व त्यांना मदत पोहोचविण्याचे काम करावे लागत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in