मोदी सत्तेत आल्यानंतर एकही मोठा दहशतवादी हल्ला नाही! संरक्षणमंत्र्यांचा दावा

दहशतवादी केंद्रातील भाजप सरकारला घाबरत असल्याचा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.
मोदी सत्तेत आल्यानंतर एकही मोठा दहशतवादी हल्ला नाही! संरक्षणमंत्र्यांचा दावा
No major terrorist attack in country after arrival of Narendra Modi

केवडिया : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही. दहशतवादी केंद्रातील भाजप सरकारला घाबरत असल्याचा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी केला आहे. हे आमचं सर्वात मोठं यश असल्याचंही ते म्हणाले. (No major terrorist attack in country after arrival of Narendra Modi says Rajnath Singh)

गुजरातमधील केवडिया येथे पक्षाच्या तीन दिवसीय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवादी हल्ल्यांविषयी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत आम्ही दहशतवाद्यांना यश मिळू देणार नाही. जम्मू-काश्मीरचं तर सोडाच, पण मोदीजी सत्तेत आल्यापासून देशातील कोणत्याही भागात एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही. 

हे आमचं खूप मोठं यश आहे. याचा अर्थ दहशतवादी आता भाजप सरकारला घाबरत आहेत. ही छोटी गोष्ट नाही, असा दावा सिंह यांनी केला आहे. उरी हल्लानंतर आम्ही जे केलं (सर्जिकल स्ट्राईक) त्यानं जगाला एक स्पष्ट संदेश गेला आहे की, आम्ही आमच्या देशाप्रमाणेच सीमा पार करूनही दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो. 

यावेळी सिंह यांनी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस लष्करी जवानांविषयी तितकीशी गंभीर नव्हती. त्यांनी वन रँक-वन पेन्शन हा मुद्दा 40 वर्ष रखडत ठेवला. काँग्रेसनं हे गांभीर्यानं घेतलं असतं तर हा मुद्दा तेव्हाच मिटला असता. पण काँगेसनं त्यांची मागणी मान्य केली नाही. 

काँग्रेसचे नेते फक्त महात्मा गांधी यांच्या नावाचा विचार करत आहे. पण त्यांच्या पावलांवर चालण्यात ते अपयशी ठरले आहेत, अशी टीकाही सिंह यांनी केली. अयोध्देतील राम मंदिर हे भाजपचं आश्वासन होतं. त्यासाठी पक्षानं बाबरी मशिद पाडली त्यावेळी तीन राज्यांतील सरकारवर पाणी सोडलं. आम्ही दिलेली आश्वासनं नेहमीच पूर्ण करतो. या केवळ निवडणुकीपुरत्या घोषणा नसतात. आता कोणतीही ताकद राम मंदिर उभं राहण्यापासून रोखू शकत नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.