दुकानं, हॅाटेलच्या वेळा 'जैसे थे'; शाळा-महाविद्यालयं 15 जुलैपर्यंत बंदच

पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दुकानं, हॅाटेलच्या वेळा 'जैसे थे'; शाळा-महाविद्यालयं 15 जुलैपर्यंत बंदच
No change in restriction in pune says Home Minister Dilip Walse Patil

पुणे : कोरोना (Covid-19) रुग्णांच्या संख्येत अपेक्षित घट होत नसल्याने पुण्यातील निर्बंध 'जैसे थे' ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे दुकानं व हॅाटेलच्या वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच शाळा व महाविद्यालये 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांत निर्बंध शिथील केल्यानंतर पॅाझिटिव्हिटी रेट कमी झाल्याचेही दिसून आले आहे. (No change in restriction in pune says Home Minister Dilip Walse Patil)

पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दर आठवड्याला ही बैठक होते. त्यामुळे लॅाकडाऊनचे निर्बंध आणखी शिथील करणे किंवा कडक करणे याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. अजित पवार यांच्याकडूनच हा निर्णय घेतला जाईल, असे वळसे पाटील यांनी पत्रकात्रांशी बोलताना सांगितले. 

आढावा बैठकीनंतर वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निर्बंध शिथील केल्यानंतर पॅाझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले निर्बंधच कायम राहतील. मात्र शाळा व महाविद्यालये 15 जुलैपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने भूमिका घ्यायला हवी. कामाशिवाय घराबाहेर पडू नका, पर्यटनाला जाऊ नका, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले. लग्न सोहळ्यांमध्ये वाढत्या गर्दीबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले, लग्नकार्यांमध्ये वाढणारी गर्दी चिंताजनक आहे. तिथून मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांना सुचना दिल्या असून बैठका घ्यायला सांगितले आहे. 

दरम्यान, आजच्या बैठकीत निर्बंध जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पुण्यातील मॉल, दुकाने सायंकाळी सात, तर हॉटेल्स ही रात्री दहा वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. अभ्यासिका आणि वाचनालयेही आधी निश्चित केलेल्या वेळेतच सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक दुकानांसाठीच्या वेळाही बदलण्यात आलेल्या नाहीत. तसेच शनिवार व रविवार या दोन दिवसांचे निर्बंधही कायम राहतील. यादिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच राहतील. 

Related Stories

No stories found.