ज्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही, त्या पवारांनी काँग्रेसची‌ काळजी करू नये!

पण, पवारांना ते अद्याप जमलं नाही.
ज्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही, त्या पवारांनी काँग्रेसची‌ काळजी करू नये!
Nitin Raut replied to Sharad Pawar who criticized Congress

नवी दिल्ली : काँग्रेसची अवस्था ही नादुरुस्त हवेलीसारखी झाल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली होती. त्याला काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितील राऊत यांनी उत्तर दिले आहे. ‘ज्यांना राज्यात आजपर्यंत एकदाही स्वतःच्या पक्षाच्या मुख्यमंत्री बसविता आलेला नाही, त्या शरद पवारांनी काँग्रेसची‌ काळजी करू नये. काँग्रेस पक्षावरील टीका आम्ही सहन करणार नाही,’ असा इशाराही राऊत यांनी दिला. (Nitin Raut replied to Sharad Pawar who criticized Congress)

दिल्लीत आलेल्या नितीन राऊत यांनी आज काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पवारांच्या टीकेवर भाष्य केले.

राऊत म्हणाले की, शरद पवार यांना एकदाही स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री राज्यात बसवता आलेला नाही. ममता बॅनर्जी, मायावती या बहुमताने निवडणुका जिंकत त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. पण, पवारांना ते अद्याप जमलं नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाकडे बोट दाखवण्याऐवजी स्वतःकडे पहावं. यापुढे काँग्रेस पक्षावर टीका केली तर ती सहन केली जाणार नाही, पवारांच्या टिकेचा आम्ही निषेध करतो.

आमच्यासाठी शरद पवार हे आदरणीय नेते आहेत. राज्यातील सरकारमध्ये ते आमचे मित्रपक्ष आहेत. मात्र, अनेक वर्षांचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस पवार अशी टीका करणार असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो. 

काँग्रेस पक्ष यापूर्वीही अनेक निवडणुका हरला आहे, आतासारखी परिस्थिती पक्षावर अनेक वेळा आलेली आहे. त्या त्या संकटावर मात करून काँग्रेस पक्ष पुन्हा जोमाने उभा राहिला आहे. सध्या पक्षावर ओढावलेल्या परिस्थितीतून पक्ष नक्कीच बाहेर पडेल आणि पुन्हा नव्या जोमाने उभा राहून जनतेची सेवा करत राहील. त्यामुळे शरद पवार यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये. त्यांनी आमच्याकडे बोटे दाखवण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाचे पाहावे, असा पलटवारही राऊत यांनी पवार यांच्यावर केला.

बलात्कारासारखी घटना ही काही राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. ही एक प्रकारची विकृती आहे. त्या विकृतीचा बंदोबस्त केलाच पाहिजे. अशा घटनांमधील दोषींवर तातडीने कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण, बलात्कारासारख्या संवेदनशील विषयावर कुणीही राजकारण करू नये, असा टोलाही राऊत यांनी साकीनाका अत्याचाराच्या घटनेवरून भाजपला लगावला.

Related Stories

No stories found.