...ही योजना 'बंद करून दाखवली' याचेही श्रेय घेणार का? राणेंचा ठाकरेंना सवाल

आपल्या हस्ते शुभारंभ केलेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली.
...ही योजना 'बंद करून दाखवली' याचेही श्रेय घेणार का? राणेंचा ठाकरेंना सवाल
Chief Minister Uddhav Thackeray .jpg

मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेली गट विमा योजना बंद पडली आहे. असा आरोप भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहित अनेक सवाल केले आहेत. (Nitesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray)  

राणे यांनी आपल्या पत्रात म्हटेल आहे की, सरकार कोरोनामधील आपल्या कामगिरीबाबत स्वःताच्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही, तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोरोना काळातील कामगिरीसाठी 'सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड' प्राप्त करून घेतात. त्याचप्रमाणे आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोरोनामध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून 'मुंबई मॉडेल' चीही जगभर वाहवा मिळवून घेतात, मात्र जे खरे कोरोना वॉरीअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात?

आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पुर्णपणे बंद पाडण्यात आली आहे. हे आपणास माहित नाही का? असेही राणे यांनी म्हटेल आहे. मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार व कर्मचारी तसेच अधिकारी आणि १ एप्रिल २०११ सालापासून सेवानिवृत झालेले कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी वैद्यकीय गटविमा योजना सुरू केली होती. १ ऑगस्ट २०१५ मध्ये ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्तीहीकेली होती. सुरुवातीला २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाच्या कालावधीत ही योजना सुरु होती. मात्र, २०१७-१८ या तिसऱ्या वर्षात ०१ऑगस्ट २०१७ ला  बंद करण्यात आली. जी आता पर्यंत सुरु झालेली नाही, असा आरोपही राणे यांनी केला आहे.  

आपल्या हस्ते शुभारंभ केलेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली. त्यामुळे आता आपणास स्मरण करून देण्याची वेळ आली आहे. सदरची योजना पुन्हा कार्यान्वित होईल, या आशेवर कर्मचाऱ्यांनी स्वत: विमा काढलेला नाही. जर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्यालाच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी. जेणेकरून कर्मचारी स्वत: विमा काढतील. त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी सत्ताधारी पक्षाने स्वताच्या अर्थकारणासाठी खेळू नये, असा ईशाराही राणे यांनी दिला आहे. 

जेंव्हा ही योजना सुरु केली तेंव्हा याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते. आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या होत्या. मग जेंव्हा ही योजना बंद झाली आहे, तर याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे 'करून दाखवले'चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे 'बंद करून दाखवले' याचेही श्रेय घेणार का? असा खरमरीत सवाल नितेश राणे यांनी ठाकरे यांना केला आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.