ऐतिहासिक शपथविधी; सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच घडलं असं...

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी मंगळवारी नऊ न्यायाधीशांना शपथ दिली.
ऐतिहासिक शपथविधी; सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच घडलं असं...
Nine Judges take oath as Supreme Court judges

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी इतिहास घडला. एकाचवेळी नऊ न्यायाधीशांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने न्यायाधीशांनी शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या शपथविधीनंतर न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 24 वरून 33 वर पोहचली असून आता केवळ एक जागा रिक्त राहिली आहे. (Nine Judges take oath as Supreme Court judges)

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी मंगळवारी नऊ न्यायाधीशांना शपथ दिली. पहिल्यांदाच हा कार्यक्रम कोर्टरूमध्ये न घेता सभागृहात घेण्यात आला. एकाचवेळी नऊ न्यायाधीशांचा शपथविधी आणि कोरोना प्रोटोकॉल यामुळं हा कार्यक्रम सभागृहात घेण्यात आला. तसेच पहिल्यांदाच शपथविधी समारंभाचे थेट प्रेक्षपणही करण्यात आलं. 

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी झालेल्या शपथविधी समारंभात अनेक घटना पहिल्यांदाच घडल्या. पहिल्यांदाच एकाचवेळी नऊ न्यायाधीश व त्यामध्ये पहिल्यांदाच तीन महिला न्यायाधीशांनी एकाचवेळी शपथ घेतली. त्यामुळं पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात चार महिला न्यायाधीश काम करणार आहेत. न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 वर पोहचली असून केवळ एकच जागा रिक्त राहिली आहे. 

शपथ घेतलेल्या तीन महिला न्यायाधीशांमध्ये न्यायाधीश हिमा कोहली , न्यायाधीश बीवी नागरत्ना, व न्यायाधीश बेला एम त्रिवेदी यांचा समावेश आहे. त्यापैकी नागरत्ना या सप्टेंबर 2027 मध्ये पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. त्या कर्नाटक उच्च न्यायालयातील तिसऱ्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. न्यायाधीश बेला त्रिवेदी या गुजरात उच्च न्यायालयातील तर हिमा कोहली या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या.

आज  शपथ घेतलेले न्यायाधीश 

न्यायाधीश अभय श्रीनिवास ओका, न्यायाधीश विक्रम नाथ, न्यायाधीश जितेंद्र कुमार माहेश्वरी, न्यायाधीश हिमा कोहली , न्यायाधीश बीवी नागरत्ना, न्यायाधीश सीटी रविकुमार, न्यायाधीश एमएम सुंदरेश, न्यायाधीश बेला एम त्रिवेदी, न्यायाधीश पीएस नरसिम्हा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in