नीलेश लंके यांचा सेल्फी विथ देवेंद्र फडणवीस : चर्चेला आले उधाण

ऑडिओ व्हायरल होताच माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर जोरदार आरोप केले होते. मात्र या आरोपांना लंके यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नव्हते.
नीलेश लंके यांचा सेल्फी विथ देवेंद्र फडणवीस : चर्चेला आले उधाण
nilesh lanke, devendra fadnavis.jpg

अहमदनगर ः पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ व्हायरल झाल्यावर भाजपकडून राजकीय आरोप होत आहेत. ऑडिओ व्हायरल होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर जोरदार आरोप केले होते. मात्र या आरोपांना लंके यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नव्हते.

चित्रा वाघ यांनी काल (मंगळवार) तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेतली तसेच पत्रकार परिषदेत लंके यांच्यावर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर आज योगायोगाने देवेंद्र फडणवीस व नीलेश लंके यांची नागपूर विमानतळावर भेट झाली. या वेळी त्यांच्यात काय चर्चा झाली यावर काही कळू शकले नाही. मात्र नीलेश लंके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत एक सेल्फी काढला. हा सेल्फी आज पारनेरमधील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार व्हायरल होत आहे. यावरून भाजप दोन पाऊले मागे गेले आहे, अशी चर्चा आज पारनेरमध्ये आहे.

महसूल कर्मचारी व तलाठ्यांचे आंदोलन

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या  मनमानी व दडपशाही  कारभाराच्या विरोधात आज (ता. 25 )  तहसील कार्यालयतील कर्मचारी, तसेच  मंडलअधिकारी व तलाठी यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. देवरे यांची बदली करा किंवा आमच्या सर्वांच्या एकाच वेळी बदल्या करा अशी मागणी करत या कर्माचा-यांनी  आज आपले कामकाज  बंद आंदोलन सुरू केले आहे.


आमदार निलेश लंके यांच्याविरोधात तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे तक्रार केली होती. त्या नंतर  देवरे यांच्या  विरोधातील  चौकशी अहवाल उजेडात आला आहे. मात्र त्या नंतर तहसीलदार व कार्यलयीन कर्मचारी , मंडलअधिकारी व  तलाठी संघटणेमधील वादही उफाळून आला आहे. व आज त्यांनी देवरे यांच्या विरोधात काम बंदचे हत्यार उपसले आहे.

त्यामुळे  देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तहसील कार्यालयातील सर्व  कर्मचाऱ्यांनी व तलाठी मंडलअधिकारी ससंघटना यात सहभागी झाली आहे.या दोनही संघटनांनी या पुर्वीच निवेदन देऊन कामबंदचा इशारा दिला होता.कर्मचा-यांनी तहसीलदार देवरे यांची बदली करा नाहीतर  आमच्या  तालुक्याबाहेर बदल्या करा अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

Related Stories

No stories found.