हवेली तालुक्यात पुन्हा निर्बंध! सायंकाळी सातच्या आत घरात, अत्यावश्यक सेवांवरही बंधन

22 मे 2020 पासून लागू असणार असून संध्याकाळी सात ते सकाळी सात या वेळेमध्ये वैद्यकीय कारणाशिवाय फिरताना आढळून आल्यास नागरिकांवर कलम 144 चा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांवर देण्यात आल्याचे सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे.जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा संबंधी मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना व व्यक्तींना यामधून सूट देण्यात आलेली आहे.
हवेली तालुक्यात पुन्हा निर्बंध! सायंकाळी सातच्या आत घरात, अत्यावश्यक सेवांवरही बंधन
corona pune

किरकटवाडी : हवेली उपविभागामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोणा रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण हवेली उपविभागामध्ये नागरिकांना केवळ वैद्यकीय कारण वगळता इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडता येणार नाही, असे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी जारी केले आहेत. संध्याकाळी सात ते सकाळी या वेळेत नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी राहणार आहे. हवेली तालुक्याचा पूर्ण ग्रामीण भाग (पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पालिकेचा भाग वगळता) येथे हे आदेश लागू राहणार आहेत. 

सदर आदेश 22 मे 2020 पासून लागू असणार असून संध्याकाळी सात ते सकाळी सात या वेळेमध्ये  वैद्यकीय कारणाशिवाय फिरताना आढळून आल्यास नागरिकांवर कलम 144 चा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांवर देण्यात आल्याचे सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे.जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा संबंधी मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना व व्यक्तींना यामधून सूट देण्यात आलेली आहे.

काय आहेत आदेश?

 • सर्व शाळा, कॉलेज, प्रशिक्षण संस्था,कोचिंग क्लासेस इत्यादी बंद राहतील तथापि दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण यास सूट असेल.
 • हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील फक्त तयार पदार्थाची घरपोच सेवा देणारे हॉटेल सुरू ठेवता येतील; मात्र तिथे इतर ग्राहकांना बसून जेवणे, मद्यपान इत्यादी सेवा देता येणार नाहीत. तसेच बस डेपो येथील कॅन्टीन सुरू ठेवता येईल.
 • सर्व सिनेमा हॉल,शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, उद्याने, बार आणि सभागृह ,असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणे बंद राहतील.
 • सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, मनोरंजनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रम ,मेळावे, खेळ यांना प्रतिबंध असेल.
 • सर्व धार्मिक स्थळे,पूजेची, प्रार्थनेची ठिकाणे नागरिकांसाठी बंद राहतील.
 • वैद्यकीय बाबी आणि जीवनावश्यक बाबी वगळता 65 वर्षावरील नागरिक, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला, दहा वर्षापेक्षा लहान वयाची मुले यांना घराबाहेर फिरण्यास मनाई असेल.
 • स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियम आणि खुल्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी वापरण्याची मुभा असेल; मात्र अशा जागेवर प्रेक्षकांना प्रवेश नसेल. नागरिकांनी व्यायाम करताना सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक असेल.
 • दोन चाकी वाहनांवर फक्त एक व्यक्ती तर तीन चाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये चालक सोडून इतर दोन व्यक्तींना प्रवासाची  परवानगीसह अनुमती असेल.
 • जिल्हांतर्गत बस सेवा 50% क्षमतेसह सुरू होईल. असा प्रवास सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे; मात्र एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यातील बस सेवेबाबत शासनस्तरावरून वेगळ्याने आदेश निर्गमित करण्यात येतील.
 • सर्व प्रकारचे बाजार, दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील; मात्र अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नसेल तर असे बाजार, दुकाने बंद करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी. हे करण्यापूर्वी सदर जागेचे व्हिडिओ शूटिंग करणे व फोटो काढण्याची दक्षता घेण्यात यावी जेणेकरून नंतरचे तक्रारींना वाव राहणार नाही.
 • कंटेनमेंट झोनमध्ये वरील बाबींना मज्जाव असेल आणि आरोग्य विभागाने सुचविल्याप्रमाणे अशा प्रतिबंधित क्षेत्रात फक्त जीवनावश्यक व अत्यावश्यक बाबींची दुकाने सुरू असतील.प्रतिबंधित क्षेत्रात बँक, ओपीडी, वैद्यकीय दवाखाने यांच्यासहित सर्व प्रकारच्या अस्थापना बंद राहतील.
 • सर्व प्रकारची शासकीय कार्यालय सुरू राहतील. तसेच ग्रामपंचायतीची कार्यालयं सुरू राहतील आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातील याकडे लक्ष द्यावे.
 • पूर्वहंगामी/पूर्व पावसाळी कामे सुरू ठेवण्यात यावीत मात्र हे सर्व करीत असताना सामाजिक अंतर ठेवण्यात यावे.
 • तसेच लग्नासाठी 50 व्यक्तींच्या मर्यादित परवानगी देण्यात यावी आणि त्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवले जाईल याची सर्व संबंधितांना लेखी कल्पना परवानगी देण्यापूर्वी देण्यात यावी.
 • अंत्यविधीसाठी या कार्यक्रमात 20 पेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही.
 • तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, तंबाखू ,गुटखा खाऊन थुंकता येणार नाही.
 • सार्वजनिक ठिकाणी दारूचे सेवन अनुज्ञेय असणार नाही. दारूविक्रीची दुकाने सुरू असताना एका वेळी त्या ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती ग्राहक म्हणून असणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. संबंधित दुकानात  या सूचनेचे पालन होत नसल्यास ते तात्काळ बंद ठेवण्यात यावे.
 • हवेली उपविभागातील सर्व पेट्रोल पंप सकाळी नऊ ते सायंकाळी पाच याच वेळेत सुरू राहतील‌.
 • हवेली उपविभागामध्ये वरील आदेश आज रात्री बारा वाजल्यापासून लागू असणार आहेत

Related Stories

No stories found.