पोलिसांनी तुरूंगात डांबत उतरवला आमदारकीचा थाट

नाशिक पोलिसांनी राहुल दिलीपराव आहेर (वय 32) याला दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे.
पोलिसांनी तुरूंगात डांबत उतरवला आमदारकीचा थाट
Nashik police arrested the man pretending to be an MLA

नाशिक : आमदार-खासदारांशी ओळख असल्याचे सांगत, त्यांचे आवाज काढत लोकांची फसवणूक करण्याची अनेक प्रकरणे बाहेर येतात. पण थेट आमदार असल्याचे भासवत लोकांना फसवणाऱ्या तोतया आमदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महागड्या चारचाकी वाहनावर राजमुद्रा, आमदारांना असलेला प्रवेशपास अशी अनेक बनावट कागदपत्रे जमा करून त्याने लोकांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Nashik police arrested the man pretending to be an MLA)

नाशिक पोलिसांनी राहुल दिलीपराव आहेर (वय 32) याला दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे. तो दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील राहणारा आहे. वणी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहेर याने त्याच्याकडील महागड्या कारवर मागील व पुढील बाजुच्या काचेवर सत्यमेव जयते असं लिहिलेला अशोकस्तंब राजमुद्रा असलेला लोगो स्टीकर लावला होता. 

विधानसभेचे चित्र असलेले केवळ अधिवेशन कालावधीसाठीचा वाहन प्रवेशपास, नावाच्या लोकोचा स्टीकर लावून तो हे वाहन शासकीय असल्याचे भासवत होता. तो महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाची बनावट प्रवेश पत्रिका तयार करून गैरवापर करत होता. आपण आमदार असल्याचे सांगत इतर आमदार, शिक्षणमंत्री व इतर मंत्र्यांची आपले चांगले संबंध असल्याचे तो भासवत होता. त्यासाठी त्याने लोकप्रतिनिधी वापरतात त्याप्रमाणे वाहनावर चिन्हाचा वापर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आहेर याच्याजवळ आमदर व माजी आमदरांच्या नावांची कागदपत्रे आढळून आली आहे. शाळा अनुदानित करून देण्याचे अमिष दाखवत त्याने बनावट कागदपत्रे देत दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही तपास निष्पन्न झाले आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तीन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

नाशिकचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपुत हे पुढील तपास करत आहेत. आहेर याने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याबाबत पोलिस तपास करणार आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in