राणेंचं पत्र आलं अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून 48 तासांतच कार्यवाही  

आरोग्य सेविकांना कार्यमुक्त न करता इतर पदांवर नियुक्ती देण्यात येणार आहे.
राणेंचं पत्र आलं अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून 48 तासांतच कार्यवाही  
Narayan Rane, Uddhav Thackeray .jpg

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले होते. त्या पत्राची ठाकरे यांनी दखल घेतली आहे. आरोग्य सेविकांच्या संदर्भात राणे यांनी पत्र लिहले होते. राज्यातील आरोग्य सेविकाना कामावरून कमी करणे योग्य नाही, असे राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे होते. त्यानंतर आरोग्य सेविकांना कामावरून कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला. त्यामुळे ठाकरे यांनी राणेंच्या पत्राची दखल घेत तातडीने निर्णय घेतला आहे. (Narayan Rane's letter to Chief Minister Uddhav Thackeray)  

नारायण राणे पत्रात काय म्हणाले होते?  

कोरोना काळात अत्यंत निकडीच्या आणि धोकादायक प्रसंगी महाराष्ट्रातील विविध आरोग्य कर्मचारी यांनी कॅाल ऑन ड्युटी समजून तुटपुंज्या मानधनावर आणि तात्पुरत्या स्वरुपाची असूनही विविध ठिकाणी सेवा केलेली आहे. या सर्व प्रयत्नामुळे आपल्याला प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते. हे जरी खरे असले तरी कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आल्यावर अलीकडे या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवा समाप्ती करुन कार्यमुक्त करण्यात आले आहे. 

आरोग्य सेविकांची सेवा समाप्त करणे माणुसकीच्या दृष्टीने योग्य नाही. याच सेविकांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात धालून हजारो लोकांचे प्राण वाचविले आहेत. आता राज्यातील कोरोना संपत असताना त्वरित या आरोग्य सेविकांची सेवा समाप्त करणे योग्य वाटत नाही. या सेविकांना राज्यात कुठेही नोकऱ्या उपलब्ध नाहीत. अश्यावेळी हा निर्णय घेणे मला योग्य वाटत नाही. तरी आपण याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी विनंती राणे यांनी केली होती.

राणेंच्या पत्रानंतर राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रुक्त पदावर नेमणुका दयाव्यात असे म्हटले आहे. त्यामुळे या आरोग्य सेविकांना कार्यमुक्त न करता इतर पदांवर नियुक्ती देण्यात येणार आहे.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.