नारायण राणेंनी घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट; महाआघाडीला सूचक इशारा

नारायण राणे यांनी आपली मैत्री निभावत व्हिवा महाविद्यालयाला दिलेल्या भेटीने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काही वेगळे संकेत देणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
नारायण राणेंनी घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट; महाआघाडीला सूचक इशारा
Narayan Rane met MLA Hitendra Thakur

विरार : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज सकाळपासून जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने वसईच्या दौऱ्यावर होत. त्यांनी वेगवेगळ्या समाजाशी आणि उद्योजकांची भेट घेतली तसेच त्यांनी जनआशीर्वाद यात्रेत केंद्राच्या विकास योजनांची माहिती दिली. परंतु त्याच वेळी त्यांनी आज आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा महाविद्यालयाला भेट दिल्याने येथील राजकारणात खळबळ उडाली आहे. (Narayan Rane met MLA Hitendra Thakur)

दरम्यान, या अगोदर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्याने काही महिन्यांवर महापालिकेची येणारी निवडणूक गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या मंत्र्याच्या भेटीतून नवीन राजकरणाचा सूचक इशारा देण्याचे काम बविआने केले असल्याचे मानण्यात येत आहे. 
       
हेही वाचा : गणपतराव देशमुख उभे राहिले, तर मुख्यमंत्रीही आपले भाषण थांबवून खाली बसायचे

वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक गेल्या वर्षभरापासून रखडली आहे. महापालिकेवर प्रशासकाचे राज्य असून त्यांच्या आडून शिवसेना बहुजन विकास आघाडीला डॅमेज करण्याचे प्रयत्न करत असल्याची चर्चा येथे चांगलीच रंगत आहे. त्यातच महापालिका क्षेत्रात इतर महापालिकांपेक्षा कमी येणारी लस, ऑक्सिजनची पळवापळवी, बहुजन विकास आघाडीने केलेल्या कामाचे नाव बदलून करण्यात येणारी उदघाटने यामुळे बहुजन विकास आघाडी अगोदरच नाराज असल्याने त्यांनी केंद्रातील भाजपच्या मंत्र्यांना भेटण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच आता जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शहरात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली मैत्री निभावत व्हिवा महाविद्यालयाला दिलेल्या भेटीने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काही वेगळे संकेत देणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा : महाआघाडी सत्तेवर आली आणि वळसे पाटील-आढळरावांमधील मैत्रीचे सूर पुन्हा जुळले!
    
या भेटीबाबत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, हितेंद्र ठाकूर आणि नारायण राणे यांचे घरोब्याचे संबंध आहेत. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे प्रथमच शहरात आल्याने त्यांची भेट झाली आहे. यात कोणतेही राजकारण नाही. परंतु या भेटीतून बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.