मी कुणाला नमस्कार करायचा हा माझा प्रश्न! राणेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर

मी असतो तर म्हणालो, असतो माझ्या बापाचे स्मारक आहे. यायचे नाही, तिथे उभा राहिलो असतो.
मी कुणाला नमस्कार करायचा हा माझा प्रश्न! राणेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर
Narayan Rane .jpg

मुंबई : मला कोणाला नमस्कार करावा असे, वाटते तो माझा प्रश्न आहे. काय दूषित झाले होते, एवढेच जर स्मारकाबाबत वाटत असेल तर स्मारकाची स्थिती सुधारा. साहेबांचे स्मारक जागतिक किर्तीचे व्हावे. गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा स्वतःचे मन शुद्धा करा, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. (Narayan Rane criticizes Shiv Sena) 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईत गुरुवारी (१९ ऑगस्ट) पासून सुरु झाली. त्यानंतर त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेने आधी म्हटले होते, की राणे यांना स्मारकावर येऊ देणार नाही. त्यानंतर मी तिथे गेलो तर तिथे कोणिच दिसले नाही. उद्धव ठाकरेही दिसले नाही. मी असतो तर म्हणालो, असतो माझ्या बापाचे स्मारक आहे. यायचे नाही, तिथे उभा राहिलो असतो. शुद्धीकरण करण्यासाठी दोन-दोनशे रुपये देऊन लोक पाठवले असतील. शुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो. आमच्याकडे खुप आहेत, आम्ही पाठवले असते, असा टोला शिवसेनाला लगावला.

जनआशीर्वाद यात्रेवर सात गुन्हे नोंदवले गेले. त्यावर राणे म्हणाले, सात हजार गुन्हे दाखल करा. ज्याच्यावर गुन्हे दाखल झाले, त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. गुन्हे दाखल करणाऱ्यांना मला सांगायचे आहे, की केंद्रात आमची सत्ता आहे, असा सुचक इशारा राणे यांनी दिला. मुंबईत सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. आम्ही जागतीक किर्तिचे शहर करु. मुंबई महापालिकेत आमची सत्ता येईल. कोरोना हाताळण्यामध्ये राज्य सरकार कमी पडले. शिवसेनेचे लोक कसे वागतात हे मी जवळून पाहिले आहे. वेळ आल्यावर सगळे उघडे करीन, उघडे करण्याची वेळ आणून नये, असा इशारा राणे यांनी दिला. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणले होते की, नारायण राणे यांना ओळखत नाही. त्यावर राणे म्हणाले, मी त्यांना जवळ बोलवून ओळक करुन देईल. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आज विरोधी पक्षांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित असणार आहेत त्या विषयी विचारले असता राणे म्हणाले, मी शिवसेनेत ३९ वर्ष काढली. बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी हिंदूत्वाची होती. त्यांनी जे केले ते हिंदूत्वासाठी आणि मराठी माणसासाठी केले. मात्र, हे सत्तेसाठी लाचार झाले आहेत. 

मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मोठे नेते आहेत. लोकसभेत आणि राज्यसभेत त्यांनी विचार का मांडले नाही, असा सवाल राणे यांनी केला. १०२ व्या घटाना दुरुस्तीत सुधारणा विधेयक संसदेत मांडले त्यावर पवार यांनी टीका केली होती. त्यावर राणे यांनी उत्तर दिले, पवार यांनी हात सोडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.   

 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in