जयंतरावांना माझ्या शुभेच्छा... त्यांच्या मागे कुठलीही पिडा लागू नये!

त्यांच्याच काय कोणच्याच मागे पिडा लागू नये. कुणाच्याच मागे काही लागू नये.
जयंतरावांना माझ्या शुभेच्छा... त्यांच्या मागे कुठलीही पिडा लागू नये!
My best wishes to Jayantarao ... no crisis should come upon him

मुंबई  ः ‘‘जयंतरावांना माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांच्या मागे कुठलीही पिडा लागू नये. त्यांच्याच काय कोणच्याच मागे पिडा लागू नये. कुणाच्याच मागे काही लागू नये, असे मानणारे आपण आहोत. त्यामुळे ईडीची पिडा मागे लागेल, असे कोणी वर्तनच करू नये, अशी ईश्वराला प्रार्थना करतो,’’ अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उत्तर दिले. (My best wishes to Jayantarao ... no crisis should come upon him)

फडणवीस यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. त्यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘ईडीची पिडा टळू दे आणि आमच्या मागे जे ईडी लावताहेत, त्यांच्या मागे पिडा लागू दे,’ असे म्हटले आहे. त्यावर आपले मत काय, असे विचारल्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. 

महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ‘सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही हो सकता,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर फडणवीस म्हणाले की, याचे उत्तर काळच देऊ शकतो. आताच या संदर्भातील निर्णय आला आहे, तो काय आहे, हे मी अजून वाचला नाही. हा एका प्रकरणाचा निकाल आहे. पण, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी काही त्यांचे वाईट व्हावे, ह्या हेतूचा नाही. पण, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य नाही.

आमदार नीतेश राणे व नीलम राणे यांना पुणे पोलिसांकडून लुकआऊटचे सर्क्युलर देण्यात आलेले आहे. त्याबाबत त्यांनी सांगितले की, ते सर्क्युलर काय आहे, हे मला माहित नाही. पण, असे सर्क्युलर काढणे, हे हास्यास्पद आहे. 

कोरोनाचे संकट दूर होऊ दे. जनतेचे जीवन सुरळीत होऊ दे. महाराष्ट्रावर जी सारखं संकटं वारंवार येत आहेत. त्यात कधी वादळ, अतिवृष्टी, पूर ही संकटे येतात. त्यातून शेतकऱ्यांना बळ द्यावे, अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे.

मंदिरे सुरू करण्यामागील आमची भूमिका ही आहे की, या मंदिरावर अवलंबून असणारे लाखो लोक आहेत. गेल्या दोन वर्षांत या सर्वांच्या जीवनात विदारक अशी परिस्थिती आहे. मदिरालये सुरू आहेत, तर मंदिरे का नाहीत. कोरोना नियमांची काटेकारे अंमलबजावणी करून मंदिरे सुरू करण्याची आमची मागणी आहे. देशभरात सर्वत्र मंदिरे सुरू असताना महाराष्ट्रातच का मंदिरे बंद आहेत, त्यामुळे मंदिरे सुरू करण्याची सुबुद्धी या सरकारला गणरायाने द्यावी, असेही फडणवीस म्हणाले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in