नगरपालिका निवडणुकांचे वाजणार बिगूल 

या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीचे नियोजन सुरू केले आहे. इच्छुकांनी वरिष्टांकडून केव्हाच शब्द मिळविले आहेत.
नगरपालिका निवडणुकांचे वाजणार बिगूल 
Pudhari.jpg

अहमदनगर ः राज्य निवडणूक आयोगाने २३ ऑगस्टपासून कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकारण तापायला सुरवात झाली आहे. Municipal elections will be trumpeted

जिल्ह्यातील अकोले, शेवगाव या नगरपालिका आणि जामखेड, पारनेर आणि कर्जत या नगरपंचायतींचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. या ठिकाणी प्रभाग रचना आणि आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राहाता, कोपरगाव, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर आणि देवळाली प्रवरा यांची निवडणूक प्रक्रियेसाठीची प्रक्रियेला आता प्रारंभ होणार आहे. शिर्डी पंचायतची मुदतीला वेळ आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांनंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होतील.

हेही वाचा...

या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीचे नियोजन सुरू केले आहे. इच्छुकांनी वरिष्टांकडून केव्हाच शब्द मिळविले आहेत. लॉकडाउन शिथिल होतातच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल प्रशासन प्रभाग रचना संदर्भातील पाहणी सोमवारपर्यंत पुर्ण करून कच्चा आराखडा तयार करण्यात येईल. हा आराखडा तयार झाल्यावर लवकर निवडणूक आयोग मतदार यादी व प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करेल. या प्रशासकीय हलचाली सुरू झाल्याने राजकीय हलचालींनाही वेग आला आहे. इच्छुकांनी तर प्रभागातील लोकांच्या याद्याच तयार करून राजकीय गणित कसे जुळविता येईल याचे मनसुबे आखण्यास कार्यकर्त्यांनी सुरवात देखील केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in