एजन्सीचा वापर म्हणजे 'स्टाईल ऑफ ऑपरेशन'; सुप्रिया सुळेंचे भाजपवर शरसंधान

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील घरांवर ईडीने छापेमारी केली आहे.
एजन्सीचा वापर म्हणजे 'स्टाईल ऑफ ऑपरेशन'; सुप्रिया सुळेंचे भाजपवर शरसंधान
MP Supriya Sule criticize BJP over raid on Anil Deshmukhs residence

पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील घरांवर ईडीने छापेमारी केली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आजपर्यंत देशात एजन्सीचा वापर विरोधकांविरोधात पाहिला नाही. आता हे त्यांचे 'स्टाईल ऑफ ऑपरेशन' झाले आहे, अशी टीका सुळे यांनी केली. (MP Supriya Sule criticize BJP over raid on Anil Deshmukhs residence)

राजकारण हे विचारांचे आणि लोकांच्या सेवेसाठी असते, असे सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या, आजपर्यंत या देशात एजन्सीचा वापर आपल्या विरोधकांच्या विरोधात होताना कधी पाहिला नाही, ऐकलेला नाही पण वाचण्यात आला आहे. पण एजन्सीचा गैरवापर हा यांचे 'स्टाईल ऑफ ऑपरेशन' दिसत आहे. पवार साहेबांनाही ईडीची नोटीस आली होती. याचा अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. 

महाराष्ट्रात असले राजकारण कधी होत नाही. सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकांना त्रास देण्यासाठी महाराष्ट्रात झाला नाही. भाजपची ही नवीन एसओपी आहे. हे जाणीवपूर्वक केलं जात असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडी विकासाचे राजकारण करत आहे. वैयक्तिक पातळीवर राजकारण आम्ही कधी केले नाही आणि करणार नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. 

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी करावी, असा ठराव भाजप (BJP) कार्यकारिणीच्या बैठकीत गुरूवारी मंजूर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापेमारी केली आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

मागील काही महिन्यांत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह खासदार राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली होती. तर देशमुख यांच्या घरांवर ईडीने दोनदा छापे टाकले आहेत. भाजपकडून परब यांनाही सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आजही आता देशमुख यांच्यानंतर परब यांचा क्रमांक असल्याचं वक्तव्य केलं आहे.

आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच गुरूवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार व अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर करण्यात आला. अनिल परब यांच्यावरही वसुली प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. या छापेमारीनंतर पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in