संजय राऊतांच्या दौऱ्यात आढळराव अन् मोहिते पाटलांची दिलजमाई?

राऊतांची ही भेट अचानक ठरल्याने शिवसैनिकांचे या भेटीकडे लक्ष्य लागले आहे.
MP Sanjay Raut is visiting Khed taluka on backdrop of dispute
MP Sanjay Raut is visiting Khed taluka on backdrop of dispute

पुणे : खेड (Khed) पंचायत समिती सभापतीवरील अविश्वास ठरावावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेनेत (Shivsena) पेटलेला वाद, कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा अन् वाढता संघर्ष दोन्ही पक्षांतील नेत्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. राज्यात महाविकास आघाडीमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित असताना तालुक्यात मात्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेत खासदार संजय राऊत शुक्रवारी खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. (MP Sanjay Raut is visiting Khed taluka on backdrop of dispute)

राऊतांची ही भेट अचानक ठरल्याने शिवसैनिकांचे या भेटीकडे लक्ष्य लागले आहे. या दौऱ्यात पक्ष संघटनेची बैठक घेऊन नंतर पत्रकार परिषदेत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आढळराव आणि मोहिते पाटील यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते कोणती घोषणा करणार, आढळराव आणि मोहिते पाटील यांच्या संघर्ष कमी करण्यासाठी राऊत प्रयत्न करणार की शिवसैनिकांना बळ देणार, याबाबत उत्सुकता आहे. 

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष आहेत. त्यामुळं स्थानिक पातळीवरही  या तीन पक्षांचे कार्यकर्ते व नेत्यांनी समन्वयातून काम करणे अपेक्षित आहे. पण पुणे जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादीतील संघर्ष कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. तर मागील निवडणूकीत आढळराव यांचा पराभव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळं हा संघर्ष अधिकच वाढू लागला आहे. 

खेड पंचायत समिती सभापतींच्या अविश्वास ठरावाच्या वेळी दोन्ही पक्षातील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आढळराव व मोहिते पाटलांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. अविश्वास ठराव मंजूर झाल्याने हा वाद आणखी वाढला. मुख्यमंत्र्यांपर्यंत याची तक्रार करण्यात आली होती. पण त्यानंतरही वाद न मिटल्याने शुक्रवारच्या संजय राऊतांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. 

राऊतांसमोर पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कुरघोडीच्या राजकारणाचे पाढे वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांतील संघर्षावर या बैठकीत चर्चा होईल. यामध्ये आढळराव आणि मोहिते पाटील यांच्यातील वाद कमी करण्यासाठी राऊत प्रयत्न करू शकतात. यावेळी आढळराव काय भूमिका घेणार, हेही महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे राऊत पत्रकार परिषद घेऊन दिलजमाईची घोषणा करणार की शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहणार, याबाबत उत्सुकता आहे. 

Edited By Rajanand More 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in