खासदार डॉ. विखेंनी श्रीगोंद्यात फोडली आघाडी

भाजपनेते राधाकृष्ण विखे यांना मानणारी येथील टीम वेगळी आहे. खासदार डाॅ. सुजय यांनीही श्रीगोंद्याच्या राजकारणात वेगळी पकड ठेवली आहे.
खासदार डॉ. विखेंनी श्रीगोंद्यात फोडली आघाडी
sujay vikhe.jpg

श्रीगोंदे : उत्तरेतील विखेपाटील कुटूंबाचे श्रीगोंद्याच्या राजकारणावर कायमच लक्ष राहिले आहे. बाळासाहेब विखे पाटील यांच्यानंतर राधाकृष्ण विखे व आता डाॅ. सुजय विखे यांनी त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांवरचे लक्ष विस्तृत केल्याचे दिसते. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी श्रीगोंद्यात विखे पॅटर्नची व्याप्ती वाढविण्यासाठी ते दाखवित असलेली राजकीय परिपक्वता अधोरेखित होते. पारनेरमध्ये त्यांनी शिवसेनेची सोबत घेतली तसे श्रीगोंद्यात दोन्ही काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते त्यांच्याशी जोडले गेल्याने विखेंची अंतर्गत ताकत वाढली आहे.


विखेपाटील व श्रीगोंदे हे नाते जुनेच आहे. दिवंगत बाळासाहेब विखे यांनी तालुक्यातील त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना जीवापाड जपले होते. या जून्या कार्यकर्त्यांची जवळीक विखे यांच्या पुढच्या राजकीय पिढीनेही कायम ठेवली. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांना मानणारी येथील टीम वेगळी आहे. खासदार डाॅ. सुजय यांनीही श्रीगोंद्याच्या राजकारणात वेगळी पकड ठेवली आहे.

हेही वाचा...


पारनेरमध्ये शिवसेनेसोबत युतीचे संकेत त्यांनी दिले आहेत. मात्र त्यापूर्वीच श्रीगोंद्यात त्यांनी दोन्ही काँग्रेस खिळखिळी केली आहे. पंचायत समिती उपसभापती निवडीत समोर दिसणाऱ्या पराभवाचे विजयात रुपांतर करण्याची किमया त्यांनी स्थानिक नेत्यांच्या सोबतीने साधली. काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब शेलार व जिजाबापू शिंदे त्यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत गेलेल्या कोमल वाखारे व पंचायत समिती सदस्य रजनी देशमुख या दोघींचे पती राजकारणात विखे यांच्यासोबत आहेत. बाळासाहेब गिरमकर हे शिवाजीराव नागवडे यांना मानणारे मात्र तेही विखे यांच्यासोबतच आहेत. बाळासाहेब नाहाटा हे तालुक्यातील राजकारणात कुमासोबतही राहू जिल्ह्यात मात्र विखेपाटील यांनाच मानतात.


तालुक्यात आमदार बबनराव पाचपुते हे भाजपाची खरी ताकत आहेत. त्यांना खासदारांच्या रणनितीची मदत होत असल्याने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पाचपुते यांना बळ मिळणार आहे. कुणी काही म्हणत असले तरी आघाडीत एकमत नसल्याने आगामी काळात भाजपाची ताकत वाढण्याचे संकेत आहेत. त्याला कारण विखे पाटलांची लावलेली फिल्डिंग आहे. जिल्हा परिषदेला विखे पाटील माजी आमदार राहुल जगताप यांची छुपी युती होऊ शकते, हा अंदाज आता फोल ठरत आहे.


भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी विखे व पाचपुते यांना श्रीगोंद्यात लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिल्याने त्यादृष्टीने हे नेते कामाला लागल्याचे बोलले जाते. महामार्गाचे कामाच्या निमित्ताने खासदारांचे महिन्यात दोन तालुका दौरे होत आहेत. काष्टीत त्यांनी रस्त्याच्या कामाच्या सूचना दिल्या असून आता शहरातील फुटपाथचा वाद ते मिटविण्यासाठी उद्या (सोमवारी ) येत आहेत. खासदार तालुक्यात येवून गेले तरी पक्षाला बळच देऊन जात असल्याने उद्याच्या त्यांच्या दौऱ्याकडेही लक्ष आहे.

Related Stories

No stories found.