'खासदार डॉ. विखे पाटील म्हणजे शिवसेना नाही'

गोरेगाव (ता. पारनेर) येथील एका कार्यक्रम प्रसंगी काल (शनिवार) व्यासपीठावर खासदार डॉ. विखे पाटील यांच्या भारतीय जनता पक्षच्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेचेही काही कार्यकर्ते उपस्थित होते.
'खासदार डॉ. विखे पाटील म्हणजे शिवसेना नाही'
Shivsena.jpg

पारनेर : "खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणजे शिवसेना नाही. डॉ. विखे पाटील यांनी जरी गोरेगाव येथे म्हटले आहे  की पारनेमध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना एकत्र आहे वास्तविक हे चुकीचे आहे. शिवसेनेचा आदेश थेट मुंबईहून येत असतो. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो आदेश देतील, तो पाळणारे शिवसैनिक आहोत. पारनेरमध्ये शिवसेनेला इतर पक्षांची गरज नाही. आम्ही स्वबळावर भक्कम आहोत," अशी परखड प्रतिक्रिया पारनेर तालुका शिवसेना प्रमुख विकास रोहकले यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.


गोरेगाव (ता. पारनेर) येथील एका कार्यक्रम प्रसंगी काल (शनिवार) व्यासपीठावर खासदार डॉ. विखे पाटील यांच्या भारतीय जनता पक्षच्या  कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेचेही काही कार्यकर्ते उपस्थित होते. याचा धागा पकडून खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, "राज्यात जरी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी असली तरीही पारनेरमध्ये मात्र भाजप व शिवसेना एकत्र आहे." या त्यांच्या वक्तव्यावर रोहकले बोलत होते. ते पुढे म्हणाले, "शिवसेनेचा पक्षीय पातळीवरील कोणताही निर्णय स्थानिक पातळीवर होत नाही. आम्हाला पक्षीय आदेश थेट मुंबईहून येत असतो व तो आम्ही पाळत असतो. त्यात बदल होत नाही. येथे स्थानिक पातळीवर कोणी काहीही म्हणाले तरी त्याला अर्थ नसतो.

हेही वाचा...


शिवसेनेत श्रेष्ठींचा आदेश हा अंतिम असतो. मी स्वतः संघटनेत काम करत आहे. त्यामुळे शिवसेनेचे नियम मला चांगले माहीत आहेत. पक्षीय संघटनेच्या मुंबईत अनेकदा सभा होतात. त्या वेळी तेथे एकत्रित पक्षीय पातळीवरील निर्णय मुंबईत होतात व तेथे जो निर्णय होतो तोच आम्ही मानत असतो.


ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नाहीत. त्या वगळता इतर सर्व निवडणुकामध्ये आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेत नाहीत. पक्षीय आदेशाप्रमाणे आम्ही निर्णय घेत असतो. भविष्यात येणाऱ्या नगरपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत आम्ही पक्षीय निर्णय मानणारे शिवसैनिक आहोत. त्या बाबत पक्ष श्रेष्ठींचा जो निर्णय होईल त्या प्रमाणे निवडणुका लढविल्या जातील. त्या बाबत आता सांगता येत नाही. मात्र आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे पक्षीय आदेशाला बांधील आहोत.


पारनेर नगरपंचायत व त्या नंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो आदेश देतील व माजी आमदार तसेच आमचे नेते विजय औटी जो निर्णय घेतील तो अंतिम असेल," असेही शेवटी रोहकले यांनी सांगितले.

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.