पोटनिवडणुकीतील विजयानंतर मोहिते पाटील- परिचारकांची झेडपीसाठी मोर्चेबांधणी

एकमेकांपासून दुरावलेले परिचारक-मोहिते पुन्हा या निमित्ताने एकत्र आले.
 Mohite Patil, Paricharak, Awadade felicitated for winning the by-election .jpg
Mohite Patil, Paricharak, Awadade felicitated for winning the by-election .jpg

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) विधानसभा पोटनिवडणुकीतील विजया नंतर सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे (Bjp) स्थान अधिक बळकट करण्यासाठी विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक आणि रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjit Singh Mohite Patil) हे दोघेही आता एकमेकांच्या हातात हात घालून कामाला लागले आहेत. त्यांची ही राजकीय मैत्री अधिक घट्ट आणि मजबूत व्हावी यासाठी पंढरपूर येथील मोहिते पाटील समर्थक अमोल नागटिळक यांनी प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते आणि समाधान आवताडे या तिन्ही भाजप आमदारांना आज एकत्रित आणून त्यांचा एकाच तुळशीच्या हारात सत्कार केला. (Mohite Patil, Paricharak, Awadade felicitated for winning the by-election)

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि परिचारकांचा मोठा दबदबा होता. 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोहिते-परिचारकांमध्ये राजकीय अंतर पडले. त्याची दोघांनाही राजकीय किंमत मोजावी लागली. दरम्यान 2014 मध्ये राज्यात सत्तांतर झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली परिचारक आणि मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. एकमेकांपासून दुरावलेले परिचारक-मोहिते पुन्हा या निमित्ताने एकत्र आले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत परिचारक-मोहिते पाटीलांनी एकत्रित काम केले. त्यामुळे प्रथमच जिल्हा परिषदेवर भाजप प्रणित गटाची सत्ता आली. ती कायम ठेवण्यासाठी परिचारक आणि मोहिते यांचे कायम प्रयत्न सुरु आहेत. 

पंढरपूर पोटनिवडणुकीकडे  2024 च्या विधानसभा निवडणुकीची लिटमस चाचणी म्हणून पाहिले जात होते. याचाचणीमध्ये परिचारक-मोहिते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये या दोघा आमदारांचे वजन आणखी वाढले आहे. पोटनिवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्याला खादा लावून समाधान आवताडे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. मोहिते -परिचारकांच्या एकत्रित राजकीय ताकदीचा परिणाम म्हणूनच राष्ट्रवादीच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला. या विजयामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद दिसून आली तर महाविकास आघाडी सरकारला जनतेने नाकारल्याचे ही त्यांनी दाखवून दिले.

शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून  प्रथमच अमोल नागटिळक यांनी या तिन्ही आमदारांचा एकाच हारात गुंफून सत्कार करुन स्नेहभोजनही दिले. यापुढच्या काळात तिघा आमदारांनी एकत्रीत येवून जिल्ह्याच्या विकासाला चालना द्यावी अशी, अपेक्षा सत्कार प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी साखर कारखानदारींसमोरील भविष्यातील अडचणी आणि त्यावरील कारखानदारांनी करावयाच्या उपाय योजना संबंधीही चर्चा झाली. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in