बाळा नांदगावकर म्हणतात, "चांगले कर्म हाच राजधर्म"

महाराष्ट्रनवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. कोोरनाच्या प्रश्वभूमीवर तो साजरा होत आहे. त्याबाबत राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बाळा नांदगावकर यांनी आगळे वेगळे आवाहन करीत पक्षाच्या तीन दिवंगत सदस्यांना मदतीचे आवाहन करीतबाळा नांदगावकर यांनी "चांगले कर्म हाच राजधर्म" असा संदेश दिला आहे.
Nandgaokar
Nandgaokar

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. कोोरनाच्या प्रश्वभूमीवर तो साजरा होत आहे. (MNS Chief Raj Thakre celebrating his Birthday) त्याबाबत राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बाळा नांदगावकर (His colligue Bala Nandgaokar made  apeal) यांनी आगळे वेगळे आवाहन करीत पक्षाच्या तीन दिवंगत सदस्यांना मदतीचे आवाहन करीत बाळा नांदगावकर यांनी "चांगले कर्म हाच राजधर्म" (Good Work is Rajdharm) असा संदेश दिला आहे.

ते म्आहणाले, राजसाहेबांचा वाढदिवस हा दिवस आपणा सर्वांसाठी कोणत्याही सणा पेक्षा मोठा दिवस. राजसाहेबांनी आपणा सर्वांना ओळख, नाव सर्व दिले. आज आपण सर्व मिळून साहेबांना या वाढदिवशी त्यांना सर्वात मोठा आनंद देणारी गोष्ट करूयात. 
राजसाहेबांचा सर्वात मोठा आनंद हा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आनंदात आहे. आणि कार्यकर्त्यांच दुःख साहेबांना सहन होत नाही. मागील वर्षात आपल्या 3 कार्यकर्त्यांना हत्या व अपघाता मुळे जीव गमवावा लागला. तिन्ही जण अतिशय तरूण वयात गेले. स्वतः साहेबांनी व मी सुद्धा या तिन्ही परिवाराशी संपर्क साधून आधार देण्याचा प्रयत्न केला. ह्या तिघांचा समान धागा म्हणजे त्यांचे साहेबांवर असणारे अतोनात प्रेम व श्रद्धा. त्यामुळे आज साहेबांच्या वाढदिवशी आपणा सर्वांना विनंती करतो की आपल्या ह्या सहकाऱ्यांना आपण पुढे येऊन मदत करु यात. कर्ता पुरुष गेल्याचे दुःख हे आर्थिक मदतीने भरून येणार नाही, परंतु या आर्थिक मदतीने ह्या तिन्ही परिवारा ला मोठी मदत होईल हे निश्चित. 

आज पर्यंत साहेबांनी आपणास चांगले कर्म हाच खरा "राजधर्म" हि शिकवण दिली आहे व त्यालाच अनुसरून आज आपण आपले कर्तव्य करू यात. आपले तीन सहकारी राकेश पाटील, जमिल शेख आणि नितीन मोरे यांनी पक्ष, समाज व सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी आपले सर्वस्व पणाला लावले. या तिघांच्या परिवारातील सदस्यांचे बॅंक खाते क्रमांक व बँक डिटेलचा फोटो जोडत आहे.  तसेच मी ऑनलाइन मदत दिल्याचा फोटो जोडत आहे, यात आपणास कोणताही मोठेपणा नको, उद्दिष्ट एकच कि सगळ्यांनी प्रेरणा घेऊन या तिघांच्या परिवाराला मोठी आर्थिक मदत करू या. तुमची अगदी शंभर रुपये प्रत्येकी हि मदत सुद्धा मोलाची ठरेल. त्यामुळे सर्वांनी यथाशक्ती मदत करावी.

हि मदत करताना आपण एक लक्षात ठेवा कि या तिघांनाही आपणास सम समान मदत करायची आहे. उदा- तुम्हाला 300 रुपये मदत करायची असल्यास प्रत्येकाच्या खात्यात १०० रुपये प्रत्येकी द्यावी. हि मदत करताना सर्वांनीच सढळ हस्ते करावी हि नम्र विनंती. तसेच आपण केलेली मदत चा स्क्रीन शॉट काढून तो कंमेंट्स मध्ये शेयर करा. या ९१६७२७३४४७ या मोबाईल क्रमांकावर व्हाटस् अॅप वर करा कारण आपण केलेली मदत बरोबर पोहचली का हे या द्वारे कळेल.

नेता हा कार्यकर्त्यां मुळे व कार्यकर्त्यां मधूनच घडत असतो. आजच्या कार्यकर्त्यांमधूनच उद्याचा नेता घडत असतो. फक्त निवडणुकीपूरते कार्यकर्ता ला गृहीत न धरता त्याच्या सुख दुःखात सर्वच पक्षीय नेत्यांनी तसेच सहकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही खरच काळाची गरज आहे. या माध्यमातूनच राज साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in