आमदार सुमनताई पाटलांमुळे वाचले कोल्हापूरच्या दोघा जखमींचे प्राण 

पुढील उपचार सुरू झाले का नाही, याचीही माहिती त्यांनी घेतली.
आमदार सुमनताई पाटलांमुळे वाचले कोल्हापूरच्या दोघा जखमींचे प्राण 
MLA Sumantai Patil saves lives of two injured in Kolhapur

तासगाव (जि. सांगली) : तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर मोटारसायकल आणि आयशर ट्रक यांच्यात धडकेत दोनजण जबर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई आर. पाटील यांनी पाहिले आणि तत्काळ आपली गाडी थांबवून अपघतातील जखमींना धावपळ करून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या उपचाराची सोय करूनच त्या पुढे आपल्या कामासाठी मार्गस्थ झाल्या. आज दुपारी घडलेल्या या अपघातात जखमी दोघे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. (MLA Sumantai Patil saves lives of two injured in Kolhapur)

याबाबतची माहिती अशी, तासगाव- मणेराजुरी रस्त्यावर आज (ता. ११ सप्टेंबर) दुपारी दीडच्या सुमारास वासुंबे फाट्यावर मोटारसायकल (एम एच ९-एफएस ०४४८) आणि आयशर ट्रक (एम एच ०९ बीसी ९३५०) यांच्यात अपघात झाला. त्या अपघातात अविनाश बाळू काटकर (रा. गडमुडशिंगी, जी. कोल्हापूर) आणि शुभम बाबुराव शिंदे (रा. वसगडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हे दोघे जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. 

त्याचवेळी तेथून जाणाऱ्या आमदार सुमन पाटील यांनी अपघात पाहून आपली गाडी तातडीने थांबवली. गाडीतून उतरून पाहिले असता दोघेजण जखमी होऊन रस्त्यावर पडल्याचे त्यांना दिसले. ते पाहून त्यांनी फोन करून ग्रामीण रुग्णालयातून तातडीने मदत मागवली. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

ग्रामीण रुग्णालयातून आलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने दोन्ही जखमींना आमदार पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे उपचार सुरू केल्यानंतर एकजण गंभीर जखमी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला मिरजेला पुढील उपचारासाठी पाठवून देईपर्यंत त्या ग्रामीण रुग्णालयात थांबून राहिल्या होत्या. वेळेवर उपचार मिळाल्याने गंभीर जखमींवर तातडीने उपचार सुरू झाले आहेत. पुढील उपचार सुरू झाले का नाही, याचीही माहिती त्यांनी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.