पूरग्रस्तांसाठी आमदार संग्राम जगताप धावले, संसारोपयोगी साहित्य घेऊन गाड्या रवाना

सुमारे दोन हजार कुटुंबियांसाठी संसारोपयोगी वस्तू पाठविल्या. येत्या दोन दिवसांत सांगली, कोल्हापूरमध्येही मदत पाठविण्यात येणार आहे.
पूरग्रस्तांसाठी आमदार संग्राम जगताप धावले, संसारोपयोगी साहित्य घेऊन गाड्या रवाना
sangram jagtap.jpg

नगर : कोकणात अतिवृष्टीने हाहाःकार उडाला असून, अनेकांचा बळी गेला. संसार उद्वस्थ झाले. त्यांच्या मदतीसाठी नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने नियोजन केले. सुमारे दोन हजार कुटुंबियांसाठी संसारोपयोगी वस्तू पाठविल्या. येत्या दोन दिवसांत सांगली, कोल्हापूरमध्येही मदत पाठविण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यापासून कोकणात अतिवृष्टी, ढकफूटीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून रस्ते बंद झाले. काही घरांवर डोंगर कोसळून अनेक नागरिक त्याखाली दबले. या पुराने अनेकांचे बळी घेतले. मोठ्या आर्थिक आणीबरोबर मनुष्यहानी झाली. हे लक्षात घेऊन आमदार जगताप यांनी तातडीने मदतीचे नियोजन केले.

सध्या काही नेत्यांनी तेथे दौरे सुरू केले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मंत्री, आमदार, खासदारांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करीत आहेत. परंतु जगण्यासाठी आवश्यक असणारे अन्न, कपडे देण्यासाठी बहुतेकांनी पुढाकार घेतला नव्हता. आमदार जगताप यांनी मात्र पाहणी दौऱ्याचा फार्स न करता आधी मदत देण्याची तयारी केली. त्यानुसार संसारोपयोगी वस्तू, जगण्यासाठी आवश्यक असणारे अन्न पाठविण्याचे नियोजन केले. महड येथील परिस्थिती भयंकर आहेत. तेथे तातडीने मदत पाठविण्यात आली. त्यामध्ये कपडे, साबण, मेनबत्ती, पाण्याच्या बाॅटल, लहान मुलांचे कपडे, टाॅवेल अशा तसेच इतर वेगवेळ्या प्रकारचे कपडे पाठविले. अऩ्नामध्ये पॅकिंगमधील विविध प्रकारचे अन्न, बिस्किटे पाठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे डाॅक्टरांच्या सल्ल्याने सर्वसामान्य आजारासाठी पुरेशी औषधे पाठविण्यात आली आहेत. सुमारे दोन हजार कुटुंबियांना पुरेल एव्हढी मदत पाठवून जगताप यांनी जिल्ह्यातून मदतीत आघाडी घेतील आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी मदतीची तयारी

कोल्हापूर, सांगली जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून महापुरामुळे मोठे नुकसान होत आहे. तेथेही मोठ्या प्रमाणात मदतीचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत संसारोपयोगी वस्तू घेऊन संबंधित गाड्या रवाना होणार आहेत.

तेथे तातडीने अन्न व कपड्यांची गरज

पूरग्रस्तांचे नुकसान पाहून मन हेलावते. तेथे तातडीने अन्न व कपड्यांची गरज आहे. त्यामुळेच दोन हजार कुटुंबियांना पुरेल एव्हढी मदत महाडला पाठविली आहे. अजूनही मदतीचे नियोजन करण्यात येत असून, कोल्हापूर, सांगली जिल्हयात ती पाठविण्यात येणार आहे.

- संग्राम जगताप, आमदार

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in