खताच्या रांगेतील शेतकऱ्यांशी आमदार लहामटेंनी साधला संवाद

अकोल्यात भाताची आवणी झालेली असून, आता युरिया हे खत त्यासाठी आवश्यक आहे. मात्र युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे.
खताच्या रांगेतील शेतकऱ्यांशी आमदार लहामटेंनी साधला संवाद
kiran lahamte.jpg

अकोले ः राजूरसह कोतूळ व इतर परिसरातील गावातील सर्वच कृषी दुकानांत युरिया मिळविण्यासाठी उभ्या असणाऱ्या शेतकऱ्यांची आमदार किरण लहामटे यांनी भेट घेतली. MLA Lahamate interacted with the farmers in the manure queue


अकोल्यात भाताची आवणी झालेली असून, आता युरिया हे खत त्यासाठी आवश्यक आहे. मात्र युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे. परिस्थिती लक्षात घेता, संबंधित सर्वच कृषी दुकानचालकांना सरसकट, आवश्यकता त्याला युरिया या तत्त्वावर वाटप करण्यास त्यांनी सांगितले. तसेच, कृषी अधिकाऱ्यांना युरियाच्या कमतरतेची जाणीव करून दिली. आज दुपारपर्यंत ज्या शेतकऱ्यांना साठा संपल्यामुळे युरिया मिळाला नाही, त्यांनाही अतिरिक्त युरिया आणून पुरवला जाईल याची व्यवस्था केली.

हेही वाचा...

कोणत्याही शेतकऱ्याची युरिया खतासाठी अडवणूक होणार नाही याची दक्षता मी घेत आहे. योग्य दरात युरिया उपलब्ध होईल. कोणत्याही कृषी दुकानात वाजवीपेक्षा अतिरिक्त दरात विक्री करण्यात आली तर माझ्याशी थेट संपर्क साधावा, असेही आमदार लहामटे म्हणाले.


काही अपरिहार्य कारणांमुळे कृषी दुकानांवर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झालेली बघायला मिळाली. माझे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे, की आपण कोणत्याही प्रकारची चिंता न बाळगता निश्चिंतपणे युरिया खत खरेदी करावे. आपल्याला या खताची मतदारसंघात कमतरता पडणार नाही, असे लहामटे म्हणाले.

हेही वाचा...


राज्य सरकारने व कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे देण्याची केलेली घोषणा फसवी ठरली आहे. खताचा अपुरा पुरवठा होत असल्याने तालुक्यातील आदिवासी भागातील कुमशेत, लव्हाळी, घोटी, गुहिरे, शिरपुंजे, खडकी, केळुंगण, मोहंडुळवाडी आदी ४० गावातील ग्रामस्थ राजूर येथे कृषी माल पुरवठा केंद्रात पहाटे चार वाजेपासून रांगेत उभे असतात. त्यांच्याकडे ना मास्क ना सामाजिक अंतर ना सॉनिटायझर असते. त्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
या बाबत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत पुरवठा अधिक व्हावा व विभागवार पुरवठा झाल्यास शेतकरी अडचणीत सापडणार नाही. जिल्हाधिकारी यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत संबंधितांना कळविले.


आमदार किरण लहामटे व कृषी अधिकारी यांनीही शेतकऱ्यांना खत पुरवठा केला जाईल. मात्र उपस्थित शेतकरी नाराजी व्यक्त करत कोल्हार घोटी रस्त्यावर बसावे लागेल, असे सांगत होते. एका कार्यक्रमानिमित्त राजूर येथे आलेल्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे हाल पाहून सरकारवर जोरदार टीका केली. कोल्हे म्हणाले की, बांधावर खते देणारे सरकार आज रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याला खते देऊ शकत नाही .हे या सरकारचे अपयश आहे. खतासाठी दोन दिवस शेतकरी मुक्कामाला थांबून खते नेत आहेत.
 

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.