जयंत पाटलांना या कारणासाठी आमदार आशुतोष काळे साकडे घालणार

साठवण तलाव भरल्यानंतर आवश्यकता वाटल्यास शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याची मागणी आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे करणार आहोत.
जयंत पाटलांना या कारणासाठी आमदार आशुतोष काळे साकडे घालणार
Ashutosh Kale.jpg

कोपरगाव : ‘‘गोदावरी कालव्यांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसांत कालवे पूर्ण क्षमतेने वाहायला सुरवात होईल. पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू झाले आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. साठवण तलाव भरल्यानंतर आवश्यकता वाटल्यास शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याची मागणी आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे करणार आहोत,’’ अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

काळे म्हणाले, ‘‘मध्यमेश्वर मध्यम प्रकल्प आज ‘ओव्हर-फ्लो’ होताच आपण पुढाकार घेऊन गोदावरी कालव्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू केले. त्यामुळे धरणांचे दरवाजे बंद असताना मधल्या अंतरात, आज कोसळलेल्या पावसाच्या पाण्यावर हे आवर्तन सुरू झाले आहे. तत्परतेने आवर्तन सुरू झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल. पुढील दोन-चार दिवसांत लाभक्षेत्रात पाऊस झाला नाही, तर शेतीसाठीदेखील आवर्तन सोडता येईल. मागील वर्षी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेती सिंचनासाठी एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तनांचा लाभ गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मिळाला.

पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले. लाभक्षेत्रात तुलनेत कमी पाऊस आहे. आता पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळेल.’’

तर पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल

पाणीयोजनांची तळी भरल्यानंतर शेतीसाठी पाण्याची गरज नसेल तर कालव्यांचे पाणी साठवण तलावांत साठविण्यासाठी जागरूकता दाखविणे गरजेचे आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढेल. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल.
- आशुतोष काळे, आमदार

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in