'रयत'च्या उपाध्यक्षपदी आमदार चेतन तुपे 

रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी हडपसरचे आमदार चेतन तुपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सातारा येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शनिवारी (ता. 27 जून) ही निवड करण्यात आली आहे. तुपे यांची ही निवड आगामी तीन वर्षांसाठी असणार आहे.
'रयत'च्या उपाध्यक्षपदी आमदार चेतन तुपे 
MLA Chetan Tupe elected as Vice President of Rayat Shikshan Sanstha

हडपसर (पुणे)  : रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी हडपसरचे आमदार चेतन तुपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सातारा येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शनिवारी (ता. 27 जून) ही निवड करण्यात आली आहे. तुपे यांची ही निवड आगामी तीन वर्षांसाठी असणार आहे. 

चेतन तुपे हे रयत शिक्षण संस्थेच्या पश्‍चिम विभागात गेली 12 वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून दहा वर्षांपासून काम पाहत आहेत. साधना शैक्षणिक संकुलच्या व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणूनही ते बारा वर्षांपासून कार्यरत आहेत.

हडपसर येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तुपे यांचे वडील माजी खासदार (कै.) विठ्ठलराव तुपे पाटील हे देखील संस्थेचे उपाध्यक्ष होते. तुपे यांच्या नियुक्तीमुळे रयत सेवक व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. 
 

'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवार, सचिवपदी डॉ. विठ्ठल शिवणकर 

सातारा : आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. 

संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, जयश्री आनंदराव चौगुले, अरुण पुंजाजी कडू-पाटील, पी. जे. पाटील, आमदार चेतन तुपे यांची, तर सचिवपदी नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांची निवड झाली आहे. 

या सर्व पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षांसाठी बिनविरोध निवडी झाल्या आहेत. उच्च शिक्षण सहसचिवपदी येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांची तसेच माध्यमिक शिक्षण सहसचिवपदी नगर येथील संजय नागपूरे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांचीही निवड करण्यात आली. 

रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षासाठी निवड करण्याकरीता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संस्थेच्या जनरल बॉडीची सभा आज झाली. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर तीन वर्षानी केली जाते. या निवडी आजवर कर्मवीर पुण्यतिथी दिवशी म्हणजेच नऊ मे रोजी केल्या जात. 

यंदा कोरोनामुळे या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आज सुरक्षित अंतराचे नियम पाळून जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्यासह सर्व जनरल बॉडीचे सदस्य उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.