सत्यशील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे वादात आमदार बेनकेंची मध्यस्थी

बोऱ्हाडे हे आता काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे....
सत्यशील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे वादात आमदार बेनकेंची मध्यस्थी
benake-borhade

पुणे : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या जुन्नर तालुक्यातील सत्यशील शेरकर विरुद्ध अक्षय बोऱ्हाडे यांच्या वादाने आज वेगळे वळण घेतले. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या शिष्टाईने शेरकर आणि बोराडे यांच्यातील वाद मिटला आहे. आमदार बेनके यांच्यासोबत त्या दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तीन दिवसांपूर्वी शिवस्फूर्ती फौंडेशनचे संस्थापक अक्षय बोऱ्हाडे यांनी एक व्हिडीओ व्हायरल करत'विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी बंगल्यावर बोलावून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

अक्षय हे मानसिकदृष्ट्या खचलेले आणि वयोवृद्ध लोकांचा आश्रम चालवत असल्याने राज्यभर त्यांची वेगळी ओळख आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणात राज्यातून मोठा पाठींबा मिळाला. शेकडो लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी अक्षयला पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर अक्षयला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. त्याचदरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी,"या प्रकरणातील दोन्ही बाजू तपासून बघाव्यात."असे विधान केल्याने त्यांनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. याबाबत शेरकर यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

आज दुपारी आमदार अतुल बेनके यांनी बोऱ्हाडे आणि शेरकर प्रकरणात मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवला. तसे एकत्रित फोटो व्हायरल झाले. याबाबत आमदार बेनके यांच्याशी संपर्क साधला.त्यांच्याशी बोलणे झाले नाही मात्र या वृत्ताला बेनके यांचे स्वीय सहायक प्रसाद पानसरे यांनी दुजोरा दिला आहे. `सरकारनामा`ने सत्यशील शेरकर आणि अक्षय बोऱ्हाडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचेही फोन बंद होते.

वाचा ही पण बातमी : पाचवा लाॅकडाऊन कसा असणार?

पुणे : केंद्र सरकारने पाचवा लाॅकडाऊन जाहीर करताना दिलेल्या सवलती महाराष्ट्र सरकारने देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे  महाराष्ट्रात माॅल उघडण्यास परवानगी मिळणार नाही. एकूण संख्येच्या निम्मीच दुकाने सुरू राहतील, अशी व्यवस्था केली आहे. हाॅटेल आणि रेस्टाॅरंटही बंद राहतील. प्रार्थनास्थळेही सर्वांसाठी खुली करण्यास परवानगी मिळालेली नाही. खासगी कार्यालये दहा टक्के क्षमतेने सुरू करता येतील. कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सवलती देण्यात येणार आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महापालिका, पुणे, मालेगाव, सोलापूर, औऱंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर या शहरांत आणि इतर ठिकाणी (नाॅन कंटेन्मेंट झोन) खालील काही सवलती जाहीर झाल्या आहेत.  केंद्र सरकारने माॅल, मंदिरे, हाॅटेल सुरू करण्यास परवानगी दिली होती. ती राज्याने नाकारली.
बाजार, दुकाने ही पी-1, पी-2 या तत्त्वार सुरू राहणार. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेला आणि दुसऱ्या बाजूची विषम तारखेला उघडतील

दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच उघडी राहतील.

कपड्यांच्या दुकानांत ट्रायल रूम वापरण्यास परवानगी नाही

दुकानाती एक्स्चेंज पाॅलिसी आणि रिटर्न पाॅलिसीला परवानगी नाही

दुकानात सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी दुकानदारांची. ते न केल्यास अधिकारी दुकान बंद करतील.

जवळच्या दुकानात जावे. खरेदीसाठी सायकल वापरावी किंवा पायी जाण्याचा सल्ला.

अनावश्यक बाबींसाठी लांबचा प्रवास करण्यास मनाई

Related Stories

No stories found.