मंत्री गडाखांना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या कार्याचा वारसा - महंत भास्करगिरी महाराज

देवगड फाटा ते श्री क्षेत्र देवगड (ता. नेवासे) या पाच कोयेटी रुप खर्चाच्या डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन सोमवार (ता. २३) रोजी महंत भास्करगिरी महाराजांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
मंत्री गडाखांना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या कार्याचा वारसा - महंत भास्करगिरी महाराज
Sarkarnama (3).jpg

नेवासे :  राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना  ज्येष्ठ नेते  यशवंतराव  गडाख यांच्या कार्याचा वारसा लाभलेला आहे. राजकारण, धर्मकारण व समाजकारण या तिन्हीच्या माध्यमातून त्यांनी बंधुत्व निर्माण करण्याचे काम केले. समाजाला कामाच्या माध्यमातून सुखी करण्यासाठी  मंत्रीपदासारखी शक्ती  आवश्यक असते. आणि ती आपल्या तालुक्याला मंत्री गडाखांच्या रूपाने लाभली आहे. असे प्रतिपादन  श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत  भास्करगिरी महाराज यांनी केले. 

देवगड फाटा ते श्री क्षेत्र देवगड (ता. नेवासे) या पाच कोयेटी रुप खर्चाच्या डांबरीकरण रस्त्याचे  भूमिपूजन सोमवार (ता. २३) रोजी महंत भास्करगिरी महाराजांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

हेही वाचा...

हभप रामनाथ महाराज पवार,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डीले,  संचालक भाऊसाहेब मोटे, बाळासाहेब पाटील,  जिल्हा परिषदेचे दादासाहेब शेळके, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार,  सदस्य रविंद्र शेरकर, प्रसिद्ध गायक राम व बजरंग विधाते,  शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के यावेळी उपस्थित होते.

महंत भास्करगिरी म्हणाले, " गडाख हे  मंत्री असले तरीही ते नेवासे तालुक्यासाठी पालकमंत्री म्हणूनच काम करतात. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नेते  यशवंतराव गडाख यांनी सर्वसमावेशक विकासाचे काम केले त्याच पद्धतीने त्यांच्या कार्याचा वारसा घेत मंत्री गडाख हे काम करत आहेत. 

प्रास्ताविक ऍड. काकासाहेब गायके यांनी केले. यावेळी गणेश भोरे, प्रा  बाळासाहेब शिंदे, हरिभाऊ  शेळके, सरपंच अजय साबळे, कैलास झगरे,  भीमाशंकर वरखडे, महेश मते आदी उपस्थित होते. 

३५० किलोमीटरचा मास्टर प्लॅन : मंत्री शंकरराव गडाख 

"श्रीक्षेत्र देवगडचा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. तो गुणवत्तापुर्ण पद्धतीने वेळेत पूर्ण करून घेणार असून  बंधुत्वाच्या भावनेतून व मंत्रीपदाच्या माध्यमातून आपण काम करत रहाणार आहे.  तालुक्यातील रस्त्यांसाठी पहिल्या बजेट मध्ये १०० कोटी तर दुसऱ्या बजेट मध्ये ५० कोटी रुपयांचा निधी ४४ रस्त्यांसाठी मंजूर करून आणला.  तालुक्यातील ३५० किलोमीटर रस्त्याचा मास्टर प्लॅन ही तयार केलेला आहे. कितीही अडचणी आल्या तरी मी रस्ते पूर्ण करेन असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

Related Stories

No stories found.