"एमआयएम'चे खालिद परवेज म्हणाले, "कॉंग्रेसने विश्‍वासघात केला'

ते मला वडीलांसारखे आदरस्थानी आहेत. परंतु महापालिकेत विकासकामांसाठी सहकार्य करुनही खोटी तक्रार करुन त्यांनी आपला विश्‍वासघात केला, असाआरोप स्थायी समितीचे सभापती डॉ. खालीद परवेज यांनी केला आहे.
"एमआयएम'चे खालिद परवेज म्हणाले, "कॉंग्रेसने विश्‍वासघात केला'

मालेगाव : कॉंग्रेसचे माजी आमदार रशीद शेख आणि आमचे राजकीय वैमनस्य आहे, होते व राहील. मात्र आम्ही सातत्याने निकोप राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटूंबात राजकारणापलिकडे सख्य देखील आहे. ते मला वडीलांसारखे आदरस्थानी आहेत. परंतु महापालिकेत विकासकामांसाठी सहकार्य करुनही खोटी तक्रार करुन त्यांनी आपला विश्‍वासघात केला, असे आरोप स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेज यांनी केला आहे. 

चार दिवसंपूर्वी महापालिकेची स्थायी समितीची सभा गणपूर्ती अभावी तहकूब करावी लागली होती. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती व एमआयएमचे नेते डॉ. खालीद परवेज संतापले आहेत. स्थायी समितीत कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यांचे बहुमत आहे. महापौर पदाच्या निवडणूकीत कॉंग्रेसला सहकार्य करण्याच्या अटीवर "एमआयएम'च्या नगरसेवकांनी माजी आमदार रशीद सेख यांना मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून ज्येष्ठ नेते व "एमआयएम'चे युनूस ईसा व रशीद शेख या परंपरागत राजकीय शत्रूंनी एकत्र येऊन या वाटाघाटी केल्या होत्या. त्यात श्री. ईसा यांचे चिरंजीव डॉ. खालीद यांना स्थायी समितीचे सभपातीपद देण्यात आले होते. मात्र अचानक या दोघांत वैमनस्य सुरु झाल्याने सभा तहकूब झाली होती. त्यावरून दोघांत वाद झाले. त्याबाबत महापौर ताहेर शेख यांनी स्थायी समितीचे सभापती डॉ. खालिद यांच्यावर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. या पार्श्‍वभूमीवर डॉ. खालिद यांनी कॉंग्रेस नेत्यांवर टिका केली. 

ते म्हणाले, शहरातील गुन्हेगारी कारवाया, गुंडागर्दी, कोणाचा सहभाग आहे हे मला सांगण्याची गरज नाही. स्थायी समितीची सभा जाणून बुजून तहकूब केली. सभेतील एका प्रस्तावावरुन वाद व हरकत होती. त्या संदर्भात आपणाला विचारणा केली असती तर मी उत्तर दिले असते. स्थायी समितीचे कामकाज एकमताने सुरु असताना हा वाद निर्माण केला गेला. कोरोना संसर्ग काळातही आपण सभापती या नात्याने महापौरांना वेळोवेळी सहकार्य केले. दोन स्थायी समितीच्या सभा घेऊन कोरोना संदर्भातील अत्यावश्‍यक विषयांना मंजुरी दिली. असे असताना आपण असे का केले? असा जाब विचारण्यापलिकडे आपण कोणालाही शिवीगाळ व दमबाजी केलेली नाही. हे प्रकार शेख परिवारालाच शोभतात. विधानसभा निवडणुकीत आपल्यासह परिवाराने एमआयएम हा आमचा पक्ष असल्याने पक्षाचे उमेदवार आमदार मौलाना मुफ्ती यांचे प्रामाणिक काम केले. पराभूत झाल्यापासून त्यांनी शहरातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना केलेली दमबाजी, हल्ले सर्वश्रृत आहेत. त्याबाबत गुन्हेही दाखल झालेले आहेत. श्री. शेख यांच्याबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. या प्रकाराने त्यास बाधा पोहोचली आहे. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=xvn-kIc8ooYAX-YHzne&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=930a4661709d1babeb6813bf9af26a72&oe=5F1D3427

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.