आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार... - Maharashtra government declared Maharashtra Bhushan award to singer Asha Bhosle | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 मार्च 2021

ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक गुरूवारी पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला.  

मुंबई: ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष  उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून अनके दशके मराठी तसेच देशवासीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अजूनही त्यांची गीते तेवढ्याच तन्मयतेने आणि अभिरूचीने ऐकली जातात. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांत त्यांना गायन केले. यापैकी मराठी भाषेतील त्यांनी गायलेली ‘मलमली तारुण्य माझे’, ‘केव्हातरी पाहाटे’, ‘बुगडी माझी सांडली गं’, अशी काही गीतं रसिकांना प्रचंड आवडली. घरातच गायकी असल्यामुळे गाणं शिकण्याची संधी त्यांना घरातूनच मिळाली. 

राज्य सरकारकडून 1996 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरूवात झाली. पहिला पुरस्कार महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला. तर दुसरा पुरस्कार 1997 मध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला. दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या आशाताई, मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला दिला जाईल, याबाबत चर्चा सुरू होती. आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने संगीत क्षेत्रातील मान्यवर तसेच रसिक श्रोत्यांनी समाधान व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख