महादेव जानकरांचे स्वतंत्र अस्तित्व, ते कशाला नाराज होतील?

मी गेली सोळा वर्षे समाजाच्या चळवळीत काम करतो आहे. त्यानंतर आमदार झालो. मी आमदार झाल्याने महादेव जानकर कशाला नाराज होतील? ते एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत असे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
महादेव जानकरांचे स्वतंत्र अस्तित्व, ते कशाला नाराज होतील?
Jankar- Padalkar

पुणे : मी गेली सोळा वर्षे समाजाच्या चळवळीत काम करतो आहे. त्यानंतर आमदार झालो. मी आमदार झाल्याने महादेव जानकर कशाला नाराज होतील? ते एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत असे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. 

आमदार पडळकर यांनी आज सरकारनामाला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. श्री. पडळकर आणदार झाल्याने महादेव जानकर नाराज झाल्याची चर्चा आहे. यात किती तत्थ्य आहे, असे विचारले असता श्री. पडळकर यांनी वरील प्रतिक्रीया दिली. 

श्री. पडळकर आमदार झाले. भाजपमध्ये खुपच जास्त सक्रीय झाल्याने त्यांचे जुने सहकारी महादेव जानकर नाराज झाल्याचे बोलले जाते. यासंदर्भात श्री. पडळकर यांनी त्याचे खंडन केले. ते म्हणाले, श्री जानकर एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. मी एक साधा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते कशाला नाराज होती. ते त्यांचे काम करीतच राहतील. मी आमदार झालो मात्र समाजाच्या प्रेमापुढे आमदारकीला काही महत्व नाही. आमच्या दृष्टीने समाजाचे प्रेम व पाठींबा महत्वाचा आहे. आज मी आमदार झालो, भविष्यात महादेव जानकर देखील आमदार होतील. त्यांचा पक्ष भाजप समवेत आहेत. आमचे संबंध अतिशय चागंले आहे. आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो. चर्चा करतो. भेटतो. त्यामुळे नाराजी कशी असेल.

सध्या केंद्र शासनाच्या कृषी विधेयकांविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात भाजपच्या या बीलांच्या समर्थनार्थ श्री. पडळकर यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांसह आत्मनिर्भर यात्रा काढली. त्यात विविध गावांत जाऊन, शेतीच्या बांधावर जाऊन शेतक-यांना या बीलांविषयी माहिती दिली. यासंदर्भात ते म्हणाले, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या गावातून आम्ही या यात्रेला सुरवात केली. अनेक गावांत गेलो. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी प्रगल्भ आहेत. त्यांना शेतीची व्यवस्था कळते. त्यामुळे कोणाचाही कृषी बीलांना विरोध नाही. लोकांनी आमच्या यात्रेला समर्थन दिले.
...
 

Related Stories

No stories found.