शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाकरीता कर्जपुरवठा करणार!

शेतीबरोबरच इतरही व्यवसायांच्या उत्पन्नात वाढ व्हावी. सभासदांचा विकासही व्हावा, यादृष्टीने शेतीस जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करावा. याकरिता संस्था सभासदांना कर्जपुरवठा करण्यात येईल.
शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाकरीता कर्जपुरवठा करणार!
Devidas Pingle

नाशिक : शेतीबरोबरच इतरही व्यवसायांच्या उत्पन्नात वाढ व्हावी. (Other Agricultural supportive business also grow with farming) सभासदांचा विकासही व्हावा, (Devolopment of Menbers) यादृष्टीने शेतीस जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करावा. (Farmers also cocentrate on Dairy farming) याकरिता संस्था सभासदांना कर्जपुरवठा करणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे ज्येष्ठ संचालक देवीदास पिंगळे (Devidas Pingle) यांनी केले. 

सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ऑनलाइन पद्धतीने संस्थेचे अध्यक्ष तानाजी पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे ज्येष्ठ संचालक देवीदास पिंगळे, दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे मुख्य कार्यालय गंगापूर येथे ही सभा उत्साहात पार पडली. सभेमध्ये मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, आर्थिक पत्रके, अंदाजपत्रक, नफा, लेखापरिक्षण अहवालाची नोंद आदी विषयावर चर्चा होऊन सदरचे विषय मंजूर करण्यात आले. 

संस्थेस २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३५.३२ लाखांचा नफा झाला असून, संस्थेने २०.४२ कोटींची कर्जवसुली केली आहे. सदर वर्षात संस्थेने ३. ४२ कोटी पीक कर्जवाटप केलेले आहे. तसेच, सभासदांचा सामुहिक अपघाती विमा घेतलेला असून, अपघातामध्ये निधन झालेल्या सभासदांच्या वारसांना रुपये दहा लाखांचे धनादेश देण्यात आले. सभेस उपाध्यक्ष अनिल काकड, संचालक मधुकर खांडबहाले, पंडित कातड- पाटील, संदीप पाटील, दौलत पाटील, पुंजा थेटे, रामदास पिंगळे, अरुण पाटील, अनिता चव्हाण, दत्तू थेटे, श्रीनाथ थेटे, कार्यकारी संचालक प्रकाश बोरसे, लेखापाल एस. भोर. आदी कर्मचारी उपस्थित होते. 

व्याजदर सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन 
संस्थेने २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता बँकेकडे रुपये १२ कोटींची कर्जमागणी केली आहे. तसेच, या वर्षात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत संस्थेच्या सभासदांना रुपये १.९२ कोटीची कर्जमाफी मिळवून दिलेली आहे. संस्थेने यंदा १० कोटींचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू हंगामात ३.४४ कोटींचे पीक कर्ज सभासदांना वितरित केले आहे. पीक कर्जाच्या व्याजदरातदेखील संस्थेने बँकेच्या नियमाप्रमाणे कपात करून सभासदांना दिलासा दिलेला आहे. व्याज सवलतीचा जास्तीत- जास्त सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष तानाजी पिंगळे यांनी केले आहे. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.