अखेर ज्योती देवरेंच्या पापाचा घडा भरला

देवरे यांच्या बदलीचा आदेश आज राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांना काढला आहे.
अखेर ज्योती देवरेंच्या पापाचा घडा भरला
adv. rahul zaware.jpg

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार नीलेश लंके व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. या भावनिक क्लिपमुळे राज्यातील राजकारण तापले होते. आमदार लंकेंवर भाजपकडून आरोप करण्यात आले होते. देवरे यांच्या विरोधात वातावरण तापले होते. देवरे यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठविला होता. तसेच क्लिपची चौकशीचा अहवालही वरिष्ठांना पाठविला होता. त्यानुसार देवरे यांच्या बदलीचा आदेश आज राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांना काढला आहे. त्यानुसार देवरे यांची बदलीचा आदेश निघाला आहे.      

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदलीच्या आदेशामुळे आमदार नीलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांत आनंद आहे. देवरे यांची जळगांव जिल्हयात संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार म्हणून झाली आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये देवरे या तहसीलदार म्हणून पारनेर येथे रूजू झाल्या होत्या. 

आमदार नीलेश लंके यांचे कट्टर कार्यकर्ते अॅड. राहुल झावरे यांच्या विरोधात नुकतीच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. यात देवरे यांचा हात असल्याचा झावरे यांचा आरोप होता. त्याच झावरे यांनी देवरेंच्या बदली नंतर प्रसिद्धीपत्रक काढून तहसीलदार देवरेंवर आरोप केले आहेत. 

झावरेंनी म्हटले आहे की, वादग्रस्त तहसिलदार देवरे यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्यानंतर टाळण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले होते, मात्र त्यास यश आले नसल्याचे शासनाच्या आदेशावरून स्पष्ट झाले आहे. देवरे यांच्याविरोधात यापूर्वीच लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात येणार आहे. 

देवरे यांनी देवमाणूस असलेल्या आमदार लंके यांची द्वेषापोटी केलेली बदनामी, प्रस्थापित पुढाऱ्यांच्या हस्तक म्हणून काम केले. कोरोना काळात जगभरात नाव झालेले असताना त्यांची बदनामी करण्याचा विडाच देवरे यांनी उचलला होता. महिला आयोगाकडे तक्रार करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

ज्यांच्या विरोधात विनयभंग, खंडणीचे गुन्हे दाखल केले, त्यांनाच भाऊ मानुन तालुक्याचे मनोरंजन केले. मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा आहे, अशी छाती काढुन फिरणाऱ्या पुढाऱ्यांचा मुखभंग झाला. अखेर सत्याचा विजय झाला. पापाचा घडा भरला. 

माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी चार तास पोलीस ठाण्यात बसणाऱ्या देवरे तालुका दंडाधिकारी आहेत का असा सवाल लंके यांचे निकटवर्तीय राहुल झावरे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.