सोमय्या यांच्या टार्गेटवरील विदर्भातील काँग्रेस मंत्री कोण    

ठाकरे सरकारमधील अजून काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल हाती लागल्या असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
सोमय्या यांच्या टार्गेटवरील विदर्भातील काँग्रेस मंत्री कोण    
Kirit Somaiya .jpg

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकार विरोधात चांगलीच आघाडी उघडली आहे. त्यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केले. तर आता काँग्रेसच्या मंत्र्यांचाही भ्रष्टाचार लवकरच बाहेर काढणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. (Kirit Somaiya meets Bhagwat Karad regarding Hasan Mushrif's corruption) 

हसन मुश्रीफ आणि खासदार भावना गवळी यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या यांनी आज दिल्लीत (ED) ईडीचे संचालक, आयकर विभाग आणि अर्थ मंत्रालयायाचे सचिव तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेतली. या भेटीनंतर सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, मी मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची फाईल दिली आहे. त्यावर लवकरात लवकर कारवाई होईल. 

ठाकरे सरकारमधील अजून काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल हाती लागल्या असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. त्यामध्ये शिवसेनेचे एक मंत्री आहेत. तर काँग्रेसच्या विदर्भातील मंत्र्यांचाही भ्रष्टाचार लवकरच बाहेर काढणार, असल्याचे सोमय्या यांनी म्हटेल आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे विदर्भातील मंत्री कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आरोप केल्यानंतर आता सोमय्या यांनी आपला मोर्चा काँग्रेसच्या नेत्यांकडे वळवला असल्याचे बोलले जात आहे.   

दरम्यान, सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर, राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार भावना गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ, यांच्यास अनेक नेत्यांवर विविध आरोप केलेले आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

Related Stories

No stories found.