करुणा मुंडेंच्या बीडच्या कारागृहात दोन रात्री अशा गेल्या..

अंबाजोगाईच्या अपर जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर करुणा शर्मा यांना बीडच्या जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले.
करुणा मुंडेंच्या बीडच्या कारागृहात दोन रात्री अशा गेल्या..
Karuna Munde

बीड : न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा मुंडे- शर्मा (Karuna Munde) सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात (Beed District Jail) आहेत. इतर पाच महिला कच्च्या कैद्यांबरोबरच त्यांचाही महिला विभागात मुक्काम आहे. तर, त्यांचे चालक अरुण मोरे यास मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  

परळीत येऊन पत्रकार परिषद घेऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह अनेकांचे खुलासे करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी फेसबुकवरुन जाहीर केले होते. त्यानुसार त्या रविवारी परळीत पोचल्या. मात्र, मुंडे समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली. दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगीनी विशाखा घाडगे यांनी ‘जातीवाचक शिवीगाळ का करतेस’ असा जाब विचारल्याने करुणा शर्मा यांनी बेबी छोटूमियां तांबोळी हिला खाली पाडून जखमी केले. तर, अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने पोटावर वार केल्याची फिर्याद घाडगे यांनी दिली.

यावरुन करुणा शर्मा व दत्तात्रय मोरे या दोघांवर अॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला. यावरुन परळी पोलिसांनी दोघांना अटक केली. सोमवारी अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस. स. सापतनेकर यांच्यासमोर शर्मा व मोरे यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. सोमवारचा त्यांचा मुक्काम कारागृहातच झाला असून मंगळवारही त्यांना कारागृहातच घालवावी लागली. इतर पाच महिला कच्चे कैदी व करुणा शर्मा असे सहा महिला कच्चे कैदी कारागृहात आहेत. त्यांना भेटण्यासाठी दोन दिवसांत कोणीही आले नसल्याचे सूत्रांनी सांगीतले. वास्तविक कोरोनामुळे कारागृहातील भेटीही बंद आहेत. तर एक दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी अरुण मोरे यास न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यालाही न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, करुणा मुंडे यांच्या जामिनासाठी मुंबईहून वकिल आले असून त्यांनी कारागृहात जाऊन करुणा शर्मा यांच्या वकिलपत्रावर सह्या घेतल्या. आता वकिलामार्फत त्या जामिनासाठी अर्ज करणार आहेत. त्यांना इतर सामान्य कैद्यांप्रमाणेच जेवण देण्यात आले. अनेकदा राजकीय लागेबांधे असलेले कैदी आजारी पडून तुरुंगातून रुग्णालयात जातात. करुणा यांच्याबाबतीत तसेही काही घडले नाही. त्यांनी कोणाचा दूरध्वनी आला ना त्यांनी कोणाला तुरुंगातून संपर्क साधला नाही. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in