कराड मुख्याधिकायांच्या नगरसेविकांना नोटीसा : नातेवाईकांचा पालिका कारभारात हस्तक्षेप

'येथील नगरसेविकांचे नातेवाईक पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव आणून त्यांच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. ती गोष्ट गंभीर असून तशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ते दबाव आणण्याचे त्वरित न थांबवल्यास त्या नगरसेविकांच्या अपात्रतेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येतील,' अशा नोटिसा मुख्याधिकारी यशवंत डांगे पालिकेतील महिला सदस्यांना बजावल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कराड मुख्याधिकायांच्या नगरसेविकांना नोटीसा : नातेवाईकांचा पालिका कारभारात हस्तक्षेप

कऱ्हाड : 'येथील नगरसेविकांचे नातेवाईक पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव आणून त्यांच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. ती गोष्ट गंभीर असून तशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ते दबाव आणण्याचे त्वरित न थांबवल्यास त्या नगरसेविकांच्या अपात्रतेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येतील,' अशा नोटिसा मुख्याधिकारी यशवंत डांगे पालिकेतील महिला सदस्यांना बजावल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

औंधकर यांच्यानंतर डांगे व येथील नगरसेवकात नोटिशीने ठिणगी पडली आहे. यापूर्वी तीन 'सीओं'शी नगरसेवकांशी पटत नव्हते म्हणून त्यांच्या बदलीचे ठराव करून त्यांची राजकीय वजन वापरून नगरसेवकांनी त्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानंतर आता डांगेही नगरसेवकांच्या टार्गेटवर येण्याची चिन्हे आहेत. येथून बदली झालेले मुख्याधिकारी औंधकर यांच्यानंतर आलेल्या डांगे यांनीही नगरसेवकांच्या महत्वाच्या मुद्याला हात घालून थेट अपात्र करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे पदाधिकारी विरूद्ध मुख्याधिकारी यांच्यात पुन्हा वाद उफाळणार  आहे.

येथील नगरसवेक व मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यातील वादावर नुकताच पडदा पडला आहे. गणेशोत्सवात त्यावर औंधकर यांच्या बदलीने पडदा पडला. त्याच बदलीच्या पार्श्वभुमीवर डांगे यांनी येथे पदभार स्विकारला. मात्र, त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर अवघ्या महिनाभरातच नगरसेवकांच्या अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला आहे. त्या त्या वेळी त्यांनी त्याला बंदी घालून कायद्याच्या चौकटीत काम करण्याचा प्रय़त्न केला. मात्र मुख्याधिकारी डांगे यांना काही दिवसापूर्वी महिला सदस्या विरोधात तक्रारी मिळाल्या आहेत. त्या तक्रारीत महिला नगरसेविकांचे नातेवाईक कामात हस्तक्षेप करत असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार डांगे यांनी पालिकेतील सर्वच महिला नगरसेविकांना नोटिसा काढल्या आहेत. हा प्रकार गंभीर आहे, तो न थांबल्यास तुम्हाला अपात्र करण्याचा प्रस्ताव थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू, असे या नोटिसांमध्ये त्यांनी नमूद केले आहे.

पालिकेतील महिला सदस्यांचे नातेवाईक पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या हस्तेक्षेप करतात. त्यांच्यावर दबाव आणून प्रशासकीय कामात हस्तेक्षेप केला जात आहे. काही नातेवाईक, पदाधिकारी त्यांच्या दालनात बेकायदेशीररित्या बैठका घेत आहेत. त्या तक्रारी डांगे यांच्याकडे आल्या आहेत. त्यानुसार त्यांनी वरील नोटिसा काढल्या आहेत. त्यातही 'नातेवाईकांचा हस्तक्षेप व दालनात बेकायदेशीर बैठका घेतल्या जात आहेत. त्या घेवून अधिकारी व कर्मचाऱ्यावंर दबाव आणत आहेत,' असा स्पष्ट उल्लेख केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in