नितीश कुमार देणार योगी आदित्यनाथांना टक्कर?; जेडीयूनं दिला भाजपला इशारा

बिहारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या जनता दलाने (संयुक्त) उत्तर प्रदेशात अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वतंत्रपणे लढण्याचा इशारा दिला आहे.
नितीश कुमार देणार योगी आदित्यनाथांना टक्कर?; जेडीयूनं दिला भाजपला इशारा
JDU warns BJP over UP assembly election seat distribution

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होणार असून त्यासाठी भाजपनं जय्यत तयारी सुरू केली आहे. पण भाजपसमोर आता मित्रपक्षानंच आव्हान उभं करण्याचा इशारा दिला आहे. बिहारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या जनता दलाने (संयुक्त) उत्तर प्रदेशात अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वतंत्रपणे लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जागांचं वाटप करताना भाजप व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तारेवरची कसरत करावी लागणार असं दिसतं. (JDU warns BJP over UP assembly election seat distribution)

भाजपसाठी उत्तर प्रदेशची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. जेडीयूनेही ही निवडणुक गंभीरपणे घेतल्याचे दिसते. पक्षाच्या राष्ट्रीय परिषद याबाबतचा एक ठराव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. याविषयी बोलताना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी म्हणाले, भाजप व जेडीयूमध्ये पहिल्या टप्प्यातील बोलणी झाली आहे. यापुढील चर्चेत दोन्ही पक्ष किती जागांवर लढणार याची बोलणी होतील. भाजपने आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या नाहीत तर आमचा पक्ष 200 जागांवर लढेल, असा इशारा त्यागी यांनी दिला आहे. 

जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष अनूप सिंह पटेल यांनीही भाजपबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. भाजपने अपेक्षित जागावाटप न केल्यास त्यांची अवस्था 2012 च्या निवडणुकीसारखी होईल. आम्ही उत्तर प्रदेशात 200 जागांवर लढू, असं पटेल यांनी स्पष्ट केलं. 2012 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपला केवळ 47 जागा मिळाल्या होत्या. या नेत्यांनी आता भाजपवर दबाव वाढवण्यास सुरूवात केल्यानं भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवण्यासाठी राष्ट्रीय परिषदेत विचारमंथन झाल्याचे जेडीयूचे प्रवक्ते अभिषेक झा यांनी सांगितले. त्यामुळं प्रत्येक राज्यात निवडणुकीला सामोरे जाऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्याची तयारी पक्षानं केली आहे. त्यानुसारच पक्षाकडून भाजपकडे जागांची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातही जेडीयूला मानणारे अनेक मतदार आहेत, असं झा म्हणाले.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिमा विकास पुरूष अशी आहे. त्याचा पक्षाला उत्तर प्रदेशात खूप फायदा होईल. तिथे आम्ही अनेक जागांवर निवडणूक जिंकू शकतो. असं झा यांनी सांगितलं. जेडीयूच्या या प्रयत्नांवर राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) टीका केली आहे. आरजेडीचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी म्हणाले, बिहारमध्ये क्रमांक तीनच्या पक्ष असेला जेडीयू उत्तर प्रदेशात डिपॉझिटही वाचवू शकणार नाही. पश्चिम बंगालमध्ये जी स्थिती झाली, ती अवस्था उत्तर प्रदेशात होईल, असं ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.