जयंत पाटलांच्या `बर्थडे गिफ्ट`ने एकनाथ खडसे झाले चिंब! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस आहे. हे औचित्य साधून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिले आहे. या पाणीदार गिफ्टने मुक्ताईनगरची बावन्न गावे चिंब झाली.
जयंत पाटलांच्या `बर्थडे गिफ्ट`ने एकनाथ खडसे झाले चिंब! 
Khadse- Patil

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader Eknath Khadse`s Birthday Today) नेते एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस आहे. हे औचित्य साधून (Irrigation minister Jayant patil given him a Different Gift on this eve)  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिले आहे. या पाणीदार गिफ्टने मुक्ताईनगरची बावन्न गावे (52 villages of Muktainagar get a water) चिंब झाली. 

तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत आज ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आले. यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यातील ५२ गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे देखील सहभागी झाले होते. वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजनेत, हातनूर धरणातून पावसाचे वाहून जाणारे पाणी लिफ्ट करून ओझरखेड धरणात पाठवले जाईल व या पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच औष्णिक विद्युत केंद्रासाठी केला जाणार आहे. आज ओझरखेड धरणात पाणी सोडत योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. 

यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, रोहिणीताई खडसे व विविध  मान्यवर उपस्थित होते.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.