जयंतरावांनी आता राज्याचे मुख्यमंत्री व्हावे !

एवढे प्रेम येथील जनतेने बापूंवर केले आहे.
जयंतरावांनी आता राज्याचे मुख्यमंत्री व्हावे !
Jayant Patil should be the Chief Minister now : Basavaraj Patil

जत (जि. सांगली) : जत तालुक्याचा पाणीप्रश्न वर्षानुवर्ष आहे. येथील जनतेने ३५ वर्षे कशी काढली याची जाणीव मला आहे. पाण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलने, उपोषण, संघर्ष केला. आता कोणी काहीही म्हटले तरी वंचित गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ योजना होणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे ठाम आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

दरम्यान, याच मेळाव्यात बोलताना सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले की, राजारामबापूंनी दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी खूजगाव धरणाची संकल्पना मांडली. ती पूर्ण झाली नाही. मात्र, त्यांचे अपुरे स्वप्न त्यांच्या मुलाने पूर्ण केले. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी निम्मी गावे पाण्यापासून वंचित राहिली. जयंतरावांनी आता मुख्यमंत्री व्हावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. (Jayant Patil should be the Chief Minister now : Basavaraj Patil)

जत तालुक्यातील वंचित ६५ गावांसाठी जलसंपदा मंत्र्यांनी सहा टीएमसी पाण्याची घोषणा केली होती. योजनेच्या पूर्णत्वाला धरून अनेक गैरसमज व अफवा विरोधकांकडून पसरवले जात होते. या गैरसमजेला जलसंपदा मंत्री पाटील यांनी पूर्णविराम दिला. शिवाय योजनेचा आराखडा येत्या सहा महिन्यात तयार होताच पहिल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निधीची तरतूद करून, योजनेच्या कामाला सुरुवात करू, असे स्पष्ट केले.

जत तालुक्यातील संख येथे शेतकरी मेळावा व दिग्गज नेत्यांचा प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील, केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य प्रकाश जमदाडे, माजी सभापती मन्सूर खतीब व माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या उपस्थित प्रवेश झाला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांनी केले.

या वेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, अॅड. बाबासो मुळीक, महिला जिल्हाध्यक्ष सुश्मीता जाधव, लालासाहेब यादव, लिंबाजी पाटील, सुजाता पाटील, पूजा लाड, दिनकर पाटील, भरत देशमुख, सुरेश शिंदे, शिध्दुआण्णा शिरसाड, आप्पासो पवार, स्वप्निल शिंदे, उत्तम चव्हाण, सुभाष पाटील, दयगोंडा बिराजदार आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

मंत्री जयंत पाटील म्हणाले, वंचित गावांना अत्याधुनिक व आदर्श वाटेल अशी ही योजना असेल. दोन आवर्तन पूर्ण होईल, यासाठी एक साठवण क्षमता असलेल्या ठिकाणचा सर्वे सुरू आहे. शिवाय वंचित गावातील तलाव भरून घेणे व थेट लाभ देणे, असे दुहेरी लाभ देऊन जतला उन्हाळ्यातही पाणी कमी पडू देणार नाही. 

सुरेश शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला सोबत घेऊन काम करू. जतच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवू. जयंतरावांनी वंचित गावाला पाणी दिले तर प्रत्येक घरात त्यांचा फोटो लागेल.

प्रकाश जमदाडे म्हणाले, दुष्काळी जनतेला जयंतरांवानी न्याय दिला. अर्थमंत्री असताना अनेक ठिकाणी तलावांची निर्मिती करून शेतकऱ्यांना पाण्याची सोय केली. वंचित गावांना म्हैसाळ योजनेचे सहा टीएमसी पाणी दिल्याबद्दल लोकांमध्ये मोठा आनंद आहे.

राजारामबापूंचा मुलगा म्हणूनच आजही ओळख 

जयंत पाटील म्हणाले, जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी देऊ शकलो, याचे समाधान आहे. आजही येथील लोक मंत्री म्हणून नाहीतर राजारामबापूंचा मुलगा म्हणून ओळखतात. एवढे प्रेम येथील जनतेने बापूंवर केले आहे. पाण्याशिवाय अनेक प्रश्न आहेत. काही दिवसांतच जिल्हा परिषद गटांत बैठका घेऊन तेथील समस्या सोडवू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.