जलयुक्त शिवार : मोदींनी कौतुक केले आणि दुसऱ्या दिवशी फडणविसांची चौकशी लावली !

आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत जल शिवारप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  जलयुक्त शिवार : मोदींनी कौतुक केले आणि दुसऱ्या दिवशी फडणविसांची चौकशी लावली !

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच देवेंद्र फडणवीस यांची राज्यात केलेल्या पाणीप्रश्‍नाबाबत तोंड भरून कौतुक केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातील ठाकरे सरकारने जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. 

जलशिवार हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट होता. या योजनेतून प्रत्येक शिवारात पाणी खेळेल असे स्वप्न राज्यातील शेतकऱ्यांनी पाहिले होते. तत्कालीन सरकारनेही हा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला होता आणि त्यासाठी गाजावाजा करीत मोठा खर्चही केला होता. मात्र जलशिवारबाबत कॅगने ताशेरे ओढले होते. त्यानंतर अर्थात थेट बोट दाखविले गेले ते फडणविसांकडे. 
दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. 

आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत जल शिवारप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

- एसआयटीमार्फत चौकशी होणार 
- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली होती 
- जलयुक्त शिवार योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रीम योजना होती 
- कॅगने या योजनेवर ताशेरे ओढले होते, त्या अनुषंगाने चौकशी होणार 
- जलयुक्त शिवार योजनेसाठी हजार कोटी खर्च झाला, मात्र त्याचा फायदा नाही 
- योजना राबवूनही राज्यात टॅंकरची संख्या वाढली 
- भूजल पातळी वाढली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.