खुशाल हायकोर्टात जावं, अधिक उजळ माथ्याने समोर येऊ!

लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. आम्ही अधिक उजळ माथ्याill ने समोर येऊ असे सांगत महाराष्ट्र सदन प्रकरण शेवटच्या टप्प्यात आलेलं असतांना निवडणुकांमुळे शिळ्या कढीला ऊत आणला गेला.
खुशाल हायकोर्टात जावं, अधिक उजळ माथ्याने समोर येऊ!
Chhagan Bhujbal

नाशिक : लोकशाही आहे, (It`s Democracy) त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. (They could approach High court) आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ (We will come out with more cleared)   असे सांगत महाराष्ट्र सदन प्रकरण शेवटच्या टप्प्यात आलेलं असतांना निवडणुकांमुळे शिळ्या कढीला ऊत आणला गेला. ‘मेरे खिलाफ होनेवाली बातो को मै अक्सर खामोशी से सूनता हुं, जबाब देने का हक मैने वक्त को दे रखा है’ अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ व इतरांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर ते नाशिकला आले. यावेळी भुजबळ फार्म येथील कार्यालयात फटाके, ढोल ताशा वाजवत, पेढे वाटून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कोंडाजी मामा आव्हाड, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, विष्णूपंत म्हैसधुणे, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार आदींनी त्यांचे स्वागत केले.  

ते म्हणाले की, आमच्यावर सर्वांचं प्रेम आहे. आज शुभदिनी नाशकात आलोय. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांना आनंद होणारचं आहे. आमच्यावर कारवाई सुरु असतांना गेल्या ५ वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मन जळत होतं. आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, कार्यकर्त्यांना खाली पाहावं लागेल, याचं दुःख होतं. तुरुंगात असतांना भुजबळांना तुरुंगातून सोडा, या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला असल्याचे सांगत असंख्य लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विधानसभा लढलो. विचारांच्या माध्यमातून लढाई लढलो, निवडणुकांच्या वेळी थोडं जास्त बोललं जातं. त्यातून काही जण दुखावले जातात. त्यानंतर सत्तेचा दुरुपयोग केला जातो. आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही पडलेत. राजकारणात प्रहार सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या राजकारणातील लोकांची सहनशक्ती कमी होत चाललीय. मात्र आता लोक हुशार झाली आहे. जास्त काळ आपण लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, हे सिद्ध झालंय अशी टीका त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारचा कारभार तर अवर्णनीय आहे. तुम्ही सरळ वागलात की तुमचा भुजबळ करू हा वाक्प्रचार झाला होता, आता तो बदलावा लागेल. माध्यमांमुळे आजकाल सर्वांना लगेचचं सर्व कळतय. जनता सब जानती है. असे सांगत केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. तसेच नाशिक- मराठवाडा पाणी वाटपाबाबत बोलतांना ते म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील पाण्याचं समन्यायी वाटप आहे. ते त्यानुसार होईल. नाशिक तसेच मराठवाडा कुणावरही अन्याय होणार नाही. त्याचबरोबर नाशिकची जलसंपदाची कार्यालयं नाशिकहून कुठेही हलवली जाणार नाहीत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक गजानन शेलार, जगदीश पवार, समीना मेमन, सुषमा पगारे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समता परिषद जिल्हाध्यक्ष संतोष डोमे, महापालिकेच्या माजी विरोधीपक्ष नेत्या कविता कर्डक, समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, माजी नगरसेवक हरिष भडांगे,  संजय खैरनार, मुख्तार शेख, नाना पवार, योगेश कमोद, दिपक वाघ, डॉ.योगेश गोसावी, स्वाती बीडला, महेश भामरे, योगेश निसाळ, शंकर मोकळ, मकरंद सोमंवशी, चिन्मय गाढे, गणेश गायधनी, संदीप गांगुर्डे यांच्यासह यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, अखिल भारतीय समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.