ही लढत 115 घोटाळे विरुद्ध 115 विकासकामे अशीच... - It is Mamata's 115 scams vs PM Modi's 115 development schemes, says Amit Shah | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

ही लढत 115 घोटाळे विरुद्ध 115 विकासकामे अशीच...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या विकासासाठी 115 चांगले प्रकल्प आणले आहेत. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कार्यकाळात मात्र 115 घोटाळे केले, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. 

पश्चिम बंगाल: विधानसभा निवडणुकीच्या तारखा जशाजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशातशा राजकारण्यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या वाढल्याचे दिसते. 27 मार्चपासून पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसते. तृणमूल काँग्रेस व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विधानसभेतील ही लढत 115 घोटाळे विरुद्ध 115 विकासकामेदरम्यानची आहे. 

पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या विकासासाठी 115 चांगले प्रकल्प आणले आहेत. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कार्यकाळात 115 घोटाळे केले. पश्चिम बंगालचा विकास हवा असल्यास विकासाच्या बरोबर चला, अशी साद शहा यांनी बघमुंडी येथील प्रचारसभेत घातली. ममता तुम्हाला फ्लोरिडेटेड (मिश्रण असलेले) पाणी देत असून भाजप सत्तेत आल्यानंतर आम्ही तुम्हाला दहा हजार कोटींचे शुद्ध पाणी देऊ, असेही ते म्हणाले. 

ममता यांच्यावर टीका करत शहा म्हणाले, ममता यांच्याकडून आतापर्यंत उद्योजकांना परतावून लावण्याचेच काम केले गेले. नव्या उद्योगांना येथे स्थिरावू दिले गेले नाही. नोकऱ्यांबाबतही त्यांनी काहीच केले नसून आजही शेकडो जण बेरोजगार आहेत. ममता यांना विकास नको असून भाजपला मतदान केल्यास विकासाला मतदान ठरेल. भाजप सत्तेवर आल्यास पश्चिम बंगालचा पूर्णपणे कायापालट होणार असून 115 विकासकामांना मत द्यायचे की 115 घोटाळ्यांना मत द्यायचे, हे सूज्ञ जनता ठरवेलच, असा टोलाही शहा यांनी लगावला. 

केंद्र सरकारने पश्चिम बंगालमधील दुर्गम भागात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत ज्या भागात रेल्वे नव्हती तो भाग रेल्वेने जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. महिलांना सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये 33 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. तसेच महिलांना सार्वजनिक वाहतूक मोफत उपलब्ध असेल. ममता बॅनर्जी डेंग्यू व मलेरियाच्या चांगल्या मैत्रिण असून डेंग्यू-मलेरियापासून सुटका हवी असेल तर भाजपलाच मतदान करा, असे आवाहन शहा यांनी केले.         

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख