इनसाईड स्टोरी : अनिल देशमुखांच्या जावयाला असं उचललं होत सीबीआयनं...  

या गोपनिय अहवालात देशमुखांना दिलासा देण्यात आला होता.
इनसाईड स्टोरी : अनिल देशमुखांच्या जावयाला असं उचललं होत सीबीआयनं...  
Anil Deshmukh, CBI .png

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकिल आनंद डागा यांना बुधवारी सायंकाळी फिल्मी स्टाईलने अनोळखी व्यक्तींनी ताब्यात घेतले. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. चतुर्वेदी हे देशमुखांचे जावई असल्याने तपास यंत्रणाही कामाला लागल्या. देशमुख कुटुंबियांना याची कल्पना नसल्यामुळे दोघांचे अपहरण झाल असे समजत. त्यांनी वरळी पोलिस ठाणे गाठले. मात्र, थोड्या वेळेतच दोघांना घेऊन गेलेले सर्वजण सीबीआयचे (CBI) अधिकारी असल्याचे समजल्यानंतर वातावरण आणखी चिघळले. त्यानंतर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. (Inside story in Anil Deshmukh case) 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये देशमुख यांच्यावर 100 कोटीच्या वसूलीचे आरोप केले होते. या आरोपामुळे देशमुखांना मंत्रीपदाच्या राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर हे प्रकरण चिघळल्याने देशमुखांना कोर्टाच्या पायऱ्या चढणयाची वेळ आली. दुसरीकडे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा मागे लागला तो वेगळाच. न्यायालयाकडूनही देशमुखाना कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळत नव्हता. सीबीआयने या गंभीर आरोपानंतर अनिल देशमुखांची 9 तास चौकशीही केली होती. या प्रकरणात सहभाग आढल्यानंतर सीबीआयने गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. या प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झाली. मनीलाँड्रीग झाल्याने ईडीने ही स्वतंत्र तपास करून गुन्हा नोंदवला. महाविकास आघाडीतील आणखी एक नेता अडचणीत आल्याचे पाहताच भाजप नेते किरीट सोमय्या यानी देशमुख यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

यानंतर ईडीने मनीलाँड्रींग प्रकरणी देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांना अटक केली. या दोघांच्या अटकेच्या कारवाई दरम्यान, ईडीने देशमुखांनाही 5 समन्स पाठवले. मात्र, ईडीच्या चौकशीला देशमुखांनी स्वताः उपस्थित न राहता वकिलांना पाठवून वेळ मारून नेहली. या दरम्यान, ईडीने देशमुखांच्या दोन मालमत्ताही जप्त केल्या. सीबीआयचे पोलिस उपायुक्त आर. एस. गुंजाल यांचा प्राथमिक अहवाल लिक झाला. 

या गोपनिय अहवालात देशमुखांना दिलासा देण्यात आला होता. गोपनिय अहवाल माध्यमांमध्येही पोहचल्याने सीबीआयने झाडाझडती सुरू केली. त्यावेळी सीबीआयचे पोलिस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनी हा अहवाल देशमुख यांच्या सहकार्यांपर्यंत पोहचवल्याचा आरोपावरून सीबीआयने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तिवारीला अटक केली. चौकशीत तिवारी देशमुखांचे वकिल आनंद डागा याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी डागा हे देशमुखांचे जावई गौरव यांच्या सोबत देशमुखांच्या जप्त केलेल्या सुखदा इमारत परिसरात असताना दोघांना ताब्यात घेतले. सीबीआयच्या तपासात गौरवचा सहभाग निष्पन्न न झाल्याने 20  मिनिटात सोडले. तर डागा यांना सीबीआयने अटक केली.

गौरव यांचा सहभाग नसतानाही सीबीआयने त्यांना ताब्यात घेतल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यानी हाच मुद्दा उचलून धरला. यानंतर सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा. अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे देशमुख कुटुंबियांनी वरळी पोलिस ठाण्यात धाव घेतली. गौरव यांचा सहभाग नसल्याने सीबीआयने त्याना सोडले. डागा आणि तिवारी या दोघांना सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले आहेत. मात्र केंद्रीय तपास यंत्रणेच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत, सूडाच्या भावनेतून या कारवाई सुरू असल्याचा आरोप, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. 

दरम्यान, देशमुखांभोवती ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणा फास आवळताना दिसत आहे. ईडीचे समन्स रद्द व्हावे यासाठी देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायालयाने प्रलंबित याचिका पाहता अनिल देशमुखांना दुसऱ्या खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे देशमुख आता पुढे काय करतात ते पाहणे महत्वाचे आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.