इंदुरीकर महाराज आमदार लंके यांच्या पाठीशी, म्हणाले...

श्रावण मासा निमित्त भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाच्या पाचव्या दिवशी इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
इंदुरीकर महाराज आमदार लंके यांच्या पाठीशी, म्हणाले...
Indorikar Maharaj.jpg

नगर ः कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. अगदी तसंच आमदार नीलेश लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. निलेश लंके यांनी उभारलेल्या या कोरोना सेंटरच्या माध्यामातून हजारो कोरोना रूग्ण कोणताही खर्च न करता बरे होऊन घरी गेले आहे. या हजारो गोरगरीब रूग्णांचे आर्शीर्वाद लंके यांना लाभले आहेत. त्यामुळे लंके आगामी 25 वर्ष आमदार राहतील, असे उदगार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी काढले. Indurikar Maharaj, with the support of MLA Lanke, said ...

श्रावण मासा निमित्त भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाच्या पाचव्या दिवशी इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. इंदुरीकर यांनी आपल्या विनोदी शैलीतून लंके यांचे कौतुक केले. धार्मिक अस्मिता व संस्कृतीचा आदर करत लंके यांनी या कोवीड सेंटरमध्ये वटपौर्णिमा, आषाढी वारी, सामुदायिक विवाह असे उपक्रम साजरे केले. सध्या श्रावणमासा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. 

हेही वाचा...

इंदुरीकर म्हणाले, राज्यातील अनेक साखर सम्राट, शिक्षण सम्राट , उद्योगपती आमदार आहेत. परंतु कुणालाही ही संकल्पना सुचली नाही. लंके यांनी ती प्रत्यक्ष करून दाखवली. राज्यातच नव्हे तर देश विदेशातही या माणसाचा नावलौकिक झाला. तरीही आमदार नीलेश लंके हे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रुग्णांच्यामध्ये बसून कीर्तन ऐकत आहेत. या लंके यांच्या साधेपणाचे कौतुकही इंदुरीकर यांनी केले. 

कोरोना महामारीचा वाढता प्रकोप लक्षात घेता आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून भाळवणी येथे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केले होते. नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक हजार शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले होते. या सेंटरमधून सुमारे 22 हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

Related Stories

No stories found.