भाजपत काहींनी माझा खूप छळ केला; आता राष्ट्रवादी सोडणार नाही : खडसे

चौकशीच्या माध्यमातून माझा छळ करण्यात आला.
भाजपत काहींनी माझा खूप छळ केला; आता राष्ट्रवादी सोडणार नाही : खडसे
I was persecuted a lot by some BJP leaders, so I will not leave the NCP now : Eknath Khadse

जळगाव  ः भारतीय जनता पक्षात काही लोकांनी माझा भरपूर छळ केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला साथ दिली, त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत आपण राष्ट्रवादी सोडणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. (I was persecuted a lot by some BJP leaders, so I will not leave the NCP now : Eknath Khadse)

भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी कोथळी येथे एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांची भेट घेतली होती. त्यावेळी दूरध्वनीवरून फडणवीस यांचा एकनाथ खडसे यांच्याशी संवाद झाला होता. त्यामुळे खडसे पुन्हा भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. 

याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, होय फडणवीस व माझी दूरध्वीद्वारे चर्चा झाली होती. संजय सावकारे यांनी फोन लावून दिला होता. त्यावेळी फडणवीस यांच्याशी आपण बोललो, त्यांची चौकशी केली. त्यांना जेवण करून जाण्याचाही आग्रह केला. मात्र, व्यस्त असल्याने त्यांनी पुढच्या वेळी येईल, असे सांगितले. याउपर आमचे काहीही बोलणे झालेले नाही.

आपण भाजपमध्ये परतण्याबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे, असे पत्रकारांनी विचारले असता खडसे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत आपण आता भाजपमध्ये जाणार नाही. भाजपमध्ये असताना काही लोकांनी माझा भरपूर छळ केला. माझ्यावर खोटे आरोप लावले. त्याच माध्यमातून माझी चौकशी लावली. दाऊदच्या बायकोशी संभाषण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. एटीएसकडून माझी चौकशी झाली. त्यानंतर माझ्याकडे भरपूर संपत्ती असल्याचा आरोप झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली. दोन वेळा ‘इन्कम टॅक्स’ची आणि आता ‘ईडी’कडून चौकशी करण्यात येत आहे. काही कारण नसताना चौकशीच्या माध्यमातून माझा छळ करण्यात आला. प्रत्येक वेळी मानसिक छळ करण्यात आला, त्या छळामुळेच मी पक्ष सोडला.

दरम्यानच्या काळात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते शरद पवार यांनी मला आधार दिला, सगळ्या चौकशाना संघर्ष करण्याची शक्ती मिळाली. ज्या पक्षांमुळे मला ताकद मिळाली. भाजपमध्ये असतो तर माझ्या या चौकशा सुरूच राहिल्या असत्या. भाजपमध्ये सत्तेच्या लालसेपोटी काही लोकांनी माझा छळ केला, त्यामुळेच मी भारतीय जनता पक्ष सोडला, असे खडसे यांनी स्पष्ट केले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in