विखे-पवार संघर्षावर चालणाऱ्या चुली बंद करणार: सुजय विखे

तशी वेळ आली तर त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना खासदार या नात्याने मी भेटू शकतो. तिथे काम नाही झाले तर त्यांनाही (रोहित पवार)विनंती करू शकतो.
i want to stop vike pawar cross sujay vikhe patil says
i want to stop vike pawar cross sujay vikhe patil says

नगर : विखे- पवार संघर्ष प्रदीर्घ चालला, मात्र तो आता शांत झाला पाहिजे. या संघर्षावर अनेकांच्या चुली चालू आहेत. मात्र त्या आता बंद कराव्या लागतील, अशी भुमिका नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी मांडली आहे.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. बाळासाहेब विखे पाटील - शरद पवार यांच्यातील संघर्ष सुजय विखे- रोहित पवार या तिसऱ्या पिढीपर्यंत आला आहे का, याप्रश्नावर सुजय विखे बोलत होते. ''आमचे पक्ष वेगळे आहेत. विचार वेगळे आहेत. विचारसरणी वेगळी आहे. वैचारिकता वेगळी आहे. कौटुंबिक परंपरा वेगळी आहे. व्यक्ती या नात्याने ते दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत, मी माझ्या पक्षाचे काम करतो आहे. जो संघर्ष होईल तो पक्षपातळीवर'', असे सुजय म्हणाले. 

सुजय विखे म्हणाले, आम्ही दोघेही नवे चेहरे आहोत. तेही निवडून आले आहेत, मीही निवडून आलो आहे. कोणाचे कर्तृत्व काय आहे, हे लोकांना पहायचे आहे. शेवटी जनतेने अवलोकन करायचे आहे. यात टीकाटिप्णीला काही महत्व नाही. महत्वाची बाब म्हणजे अनेक लोकांना वाटते की हा संघर्ष व्हावा. बऱ्याच लोकांची घरं, प्रपंच या वादावर चालू आहेत. अशा लोकांच्या चुली चालवायच्या की त्यावर पाणी ओतायचं, यावर आम्ही निर्णय घेवू शकतो. मात्र अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही. विकासात्मक दृष्टीकोन ठेवून आम्ही पुढे जात आहोत. आजपर्यंत आमचा कधी सामना झालेला नाही. ज्यादिवशी सामना होईल, त्यादिवशी खुलासा होईल आणि त्यांची भुमिका कळेल. त्यांनी स्वत:ला सिद्ध केले तर काही अडचण नाही.

कर्जत जामखेडच्या विकासासाठी आपण एकमेकांची मदत घेणार का, याप्रश्नावर सुजय विखे म्हणाले, आतापर्यत तसा प्रसंग आलेला नाही. तशी वेळ आली तर त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना खासदार या नात्याने मी भेटू शकतो. तिथे काम नाही झाले तर त्यांनाही (रोहित पवार) विनंती करू शकतो. आम्ही कोठे एकत्र आलो तर वर्तमानपत्रात येणारच आहे. माझं वैयक्तिक मतं असं आहे की, विखे -पवार संघर्ष त्याकाळात झाला. त्यात प्रदीर्घ काळ गेला. तो शांत करण्याचा प्रयत्न करू. या संघर्षातून स्वत:च्या चुली चालू ठेवण्याचा काहींचा प्रयत्न असेल तर ते मी होवू देणार नाही, असेही सुजय विखे यांनी सांगितले.

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in