शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सूर नगरमध्ये असे जुळले...

नवीन राजकीय समीकरणामुळे महापालिकेतील स्थायी समिती सभापती वगळता सर्व पदे बदलत आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सूर नगरमध्ये असे जुळले...
amc.jpg

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यांना काँग्रेसचे चार नगरसेवक व बसपचे चार नगरसेवकांचा पाठिंबा आहे. जून अखेरीचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौरांनी पदभार स्वीकारला. या नवीन राजकीय समीकरणामुळे महापालिकेतील स्थायी समिती सभापती वगळता सर्व पदे बदलत आहेत.

याचाच एक भाग म्हणून महापौरांनी महिला व बालकल्याण समिती बरखास्त केली. त्या ऐवजी नवीन महिला व बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठी सभा घेतली. नवीन सदस्य निवडी झाल्यामुळे आता महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक 15 सप्टेंबर रोजी पीठासीन अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 

हेही वाचा...

या निवडणुकीसाठी आज शिवसेनेकडून महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी पुष्पाताई बोरुडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, नगरसेविका सुरेख कदम व अनुमोदन कमळ सप्रे, शांताबाई शिंदे होत्या.  

राष्ट्रवादीकडून उपसभापती पदासाठी मीना चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर सूचक म्हणून नगरसेविका दीपालीताई बारस्कर व अनुमोदक म्हणून नगरसेविका शोभा बोरकर हे आहेत.यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी नगरसेविका शीतल जगताप, महापौर रोहिनी शेंडगे, नगरसेविका दीपाली बारस्कार, नगरसेविका शोभा बोरकर, स्थायी समितीच्या सभापती अविनाश घुले, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, मा.महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर शीला शिंदे, संभाजी कदम, नगरसेवक सचिन शिंदे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक श्याम नळकांडे, कमल सप्रे, रिता भाकरे, शांता शिंदे, सुप्रिया जाधव, अमोल येवले, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, मदन आढाव, दत्ता सप्रे, अशोक बडे, दत्ता कावरे, संतोष गेनपा, संग्राम कोतकर, विष्णू फुलसौंदर, प्रदीप बोरुडे , माजी नगरसेवक संजय चोपडा, दत्ता सप्रे आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

या उमेदवारी अर्जांमुळे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद पुष्पा बोरूडे व उपसभापतीपद मीना चोपडा यांना देण्याचे निश्चित झाले असल्याची चर्चा आज महापालिकेत आहे.

Related Stories

No stories found.