होम क्वॉरंटाइन राहूनही मदतीचा यज्ञ सुरूच ः ठाणेकर नेत्यांचे गरिबांकडे लक्ष 
Home quarantine leaders in Thane help the poor pepole

होम क्वॉरंटाइन राहूनही मदतीचा यज्ञ सुरूच ः ठाणेकर नेत्यांचे गरिबांकडे लक्ष 

ठाणे जिल्ह्यातीलया नेत्यांनी कोरोनावर मात केली.त्यांना होम क्वॉरंटाइन राहवे लागत असल्याने या नेत्यांना घरातूनच गरिबांना मदत पोचविण्याचे काम करावे लागत आहे.

ठाणे ः ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यात टाळेबंदीमुळे गोरगरीब व हातावर पोट असलेल्या मजुरांसह अनेकांची काम नसल्यामुळे आर्थिक कोंडी होत आहे. अनेक मजुरांवर उपासमारीची वेळी आली होती. ही बाब लक्षात घेऊन ठाण्यातील अनेक नेत्यांनी आपल्या मतदारसंघात गोरगरिबांच्या मदतीला धावून जात अन्नाची पाकिटे, किराणा व धान्याचे वाटप आदी कार्यक्रम हाती घेतले.

हे करताना राष्ट्रवादीच्या एका दिग्गज नेत्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसेनेच्या एका आमदाराला कोरोनाचा संसर्ग झाला. या नेत्यांनी कोरोनावर मात केली. मात्र, त्यांना होम क्वॉरंटाइन राहवे लागत असल्याने या नेत्यांना घरातूनच गरिबांना मदत पोचविण्याचे काम करावे लागत आहे. 

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मार्चमध्ये संपूर्णतः टाळेबंदी लागू करण्यात आली. या टाळेबंदीत अत्यावश्‍यक सेवेतील आस्थापना व सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना व कार्यालयीन कामांना ब्रेक लागला. त्यामुळे अनेकांना घरी बसण्याची वेळ आली.

गोरगरीब व हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली. याची गांभीर्याने दाखल घेत राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या परीने मतदार संघातील गोरगरिबांच्या मदतीला व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवू नये, यासाठी मदत पोचवत होते. त्यात राष्ट्रवादीचे एक दिग्गज नेतेदेखील त्यांच्या मतदार संघात दिवसरात्र एक करून गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून गेले. कुठे शिजवलेल्या अन्नाचे वाटप करणे, कुठे अन्नधान्याच्या किटचे वाटप करणे आदी कामे ते करत होते. त्या दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. पण, त्यावर यशस्वीरित्या मात करीत ते स्वगृही परतले आहे. 

शिवसेना आमदार पुन्हा रुग्णालयात

राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीदेखील त्यावर विजय मिळवून ते नुकतेच घरी परतले आहेत. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या एका आमदारांनाही आपल्या मतदारसंघात काम करत असताना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांनीही त्यावर विजय मिळवीत घर गाठले. पण घरी आल्यानंतर त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच ते पुन्हा घरी परततील, असा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. 

दरम्यान, जनतेची सेवा व त्यांना मदत करण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या व कोरोनाला हरवून पुन्हा घरी परतलेल्या या तीनही योद्धांना सध्याच्या घडीला होम क्वॉरंटाइनमध्ये राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता या नेत्यांना घरातूनच आपल्या मतदार संघातील गरिबांच्या अडचणी सोडवून मदत पोचविण्याचे काम करावे लागत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in