तहसीलदार देवरेंच्या विरोधात आता आरोग्य अधिकारी संपावर जाणार...

पारनेर तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदेऊन सोमवारपासून (ता. 30) काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
तहसीलदार देवरेंच्या विरोधात आता आरोग्य अधिकारी संपावर जाणार...
andolan.jpg

अहमदनगर ः पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात आता विविध विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारीच मैदानात उतरू लागले आहेत. पारनेर तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सोमवारपासून (ता. 30) काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता पारनेर तालुक्यातील महसूल पाठोपाठ आरोग्य यंत्रणाही कोलमडण्याची चिन्हे आहेत. Health workers will now go on strike against Tehsildar Deore ...

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करत. अरेरावी व हुकुमशाहीमुळे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

हेही वाचा...

निवेदनात म्हटले आहे की, कोविड महामारीमध्ये आम्ही सर्व कर्मचारी व अधिकारी आरोग्य सेवा करत आहोत. गेली दोन वर्षांपासून आम्ही कुठलीही सुट्टी न घेता स्वतःच्या आरोग्याची, कुटूंबाची पर्वा न करता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहोत. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांशी मनमानी व हुकुमशाहीने वागत आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांना वारंवार अपशब्द वापरून मानसिक छळ करत आहेत. परंतु महामारीच्या काळात आरोग्य सेवेची गरज ओळखून आम्ही गप्प होतो. 

हे आहेत आरोप
वारंवार निलंबन करण्याची धमकी देणे, खाजगी पूर्णवाद कोविड सेंटरला काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, कार्यवाहीची भीती घालणे अशा घटना गेल्या दोन वर्षांपासून वारंवार घडत आहेत. याबाबत वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविलेले आहे. परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

हेही वाचा...

कोरोना संकटकाळातील स्थिती पाहून गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत. त्यांच्या या कारभाराने तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही मोठा त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे त्यांनी 30 ऑगस्ट 2021 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्यास पारनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर 11 अधिकारी डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा
पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व तलाठ्यांच्या संपाला जिल्ह्यातील विविध संघटनांचा पाठिंबा मिळू लागला आहे. अहमदनगर जिल्हा महसूल विभाग वर्ग 3 शासकीय कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य तलाठी संघनेच्या अहमदनगर शाखेनेही आज जिल्हा प्रशासनाला पाठिंब्याचे निवेदन दिले. तसेच पारनेर तालुक्यातील विविध संघटनांतर्फेही निवेदन देऊन महसूल कर्मचारी व तलाठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. 
 

Related Stories

No stories found.