राज्यपाल हे भाजपचे पॉलिटिकल एजंट, ते भाजपला हवे तेच करतात 

त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम व आदर आहे. पण....
राज्यपाल हे भाजपचे पॉलिटिकल एजंट, ते भाजपला हवे तेच करतात 
Governor Bhagat Singh Koshiyari is the BJP's political agent : Sanjay Raut

राजगुरूनगर (जि. पुणे) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी हे भारतीय जनता पक्षाचे पॉलिटिकल एजंट आहेत, त्यामुळे भाजपला हवे तेच ते करतात, अशी थेट टिप्पणी शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी येथे आज (४ सप्टेंबर) केली. (Governor Bhagat Singh Koshiyari is the BJP's political agent: Raut)

खेड तालुक्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यानंतर राजगुरुनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. आम्ही त्यांच्या विचारांवर चालणारे असल्याने समोरुन वार करतो. पाठीत खंजीर खुपसत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून विचारलेल्या प्रश्नावर दिले. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कायदेशीरपणे कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार निपक्षपाती आणि उत्तम सरकार आहे. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे बेकायदेशीर काहीही करीत नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

राज्यपाल कोशियारी हे भाजपचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, राज्यसभा खासदार होते. एवढेच काय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारकही होते. त्यामुळे ते भाजपला हवे तसे करतात. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम व आदर आहे. पण, ते भाजपचे पॉलिटिकल एजंट आहेत, हेही सत्य आहे, असे राऊत म्हणाले. 

हेही वाचा : जे बोचके बाहेर गेले, त्याला परत शिवसेनेत घ्यायचे नाही : राऊतांचा बुचकेंना नाव न घेता टोला
 
राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसशी राजकीय वैर नाही. फक्त एका व्यक्तीमुळे खेड तालुक्यात संघर्ष वाढला आहे, त्यामुळे शिवसेना या ठिकाणी राजकीय सूड घेईल. हा विषय खेड तालुक्यापुरता मर्यादित आहे. राज्यातील महाविकास आघाडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. मृत्यूनंतर वैर नसावे. सुरेश गोरे यांच्या निधनानंतर खेडचे आमदार जे वागले, ते माणुसकीला धरून नाही. त्यामुळे त्यांच्याशी काय चर्चा करणार? उलट आघाडी म्हणून त्यांनी हा विषय सोडवायला पाहिजे होता, असे मत त्यांनी मांडले. खेड तालुक्यातील बंडखोर पंचायत समिती सदस्यांवरील कारवाईचा प्रश्न तांत्रिक असल्याचे सांगून त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. 

राऊत म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व पक्ष एकत्र आहेत. अगदी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचीही चर्चा झाली आहे. त्यामुळे त्यावर मार्ग निघेल. बैलगाड्याच्या प्रश्नाबाबत लोकभावना तीव्र आहेत. लोकांच्या श्रद्धांपुढे झुकावे लागेल. याप्रश्नी आंदोलनास शिवसेनेचा पाठिंबा असेल.

Related Stories

No stories found.